लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : जागतिक भांडवली बाजारांमधील सकारात्मक वातावरणामुळे शुक्रवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह स्थिरावले. गुरुवारच्या सत्रातील तेजीचा विस्तार करताना, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २८२.८८ अंशांनी वधारून ६४,३६३.७८ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ४५४.२९ अंशांची कमाई करत ६४,५३५.१९ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेदेखील ९७.३५ अंशांची भर घातली आणि तो १९,२३०.६० पातळीवर स्थिरावला.

मजबूत जागतिक संकेत, अर्थव्यवस्थेविषयक सकारात्मक आकडेवारी आणि देशांतर्गत कंपन्यांच्या समाधानकारक कमाईमुळे आशावाद वाढला आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेकडून भविष्यात दर वाढवण्याची शक्यता नाही. शिवाय खनिज तेलाच्या किमतीतील माफक घसरणीने आशावादात भर घातली आहे. सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या तिमाहीत लार्ज कॅप कंपन्यांच्या नफ्यामध्ये वार्षिक आधारावर सरासरी ४० टक्के वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर महागाई हे मुख्य चिंतेचे कारण असले तरी देशांतर्गत आणि बाह्य मागणीतील स्थिर वाढ ही कंपन्यांसाठी आगामी सहामाही सकारात्मक राहणार असल्याचे सूचित करत आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

आणखी वाचा-सेवा क्षेत्राची वाढ मंदावली; ऑक्टोबरमध्ये सात महिन्यांतील नीचांकी पातळी

सेन्सेक्समध्ये टायटन, टेक महिंद्र, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, स्टेट बँक आणि सन फार्मा यांचे समभाग तेजीसह बंद झाले. तर बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, नेस्ले, टाटा स्टील आणि बजाज फायनान्सचे समभाग पिछाडीवर होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारच्या सत्रात १,२६१.१९ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

बाजार आकडेवारी

सेन्सेक्स ६४,३६३.७८ २८२.८८ ( ०.४४ टक्के)

निफ्टी १९,२३०.६० ९७.३५ (०.५१ टक्के)

डॉलर ८३.२८ ६ पैसे

तेल ८६.८६ ०.०१