मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची तेजीची वाटचाल कायम असून बुधवारच्या सत्रात त्यांनी पुन्हा एकदा नवीन ऐतिहासिक शिखरांना गाठले. मात्र सत्रातील अखेरच्या तासात ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू आणि ऊर्जा समभागांमध्ये नफावसुलीला प्राधान्य दिल्याने निर्देशांक उच्चांकी पातळीपासून खाली स्थिरावले.

सलग पाचव्या सत्रात भांडवली बाजारावर तेजीवाल्यांचा जोर कायम आहे. परिणामी बुधवारच्या सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३६.४५ अंशांनी वधारून ७७,३३७.५९ या उच्चांकी पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, तो ५५०.४९ अंशांनी वधारून ७७,८५१.६३ च्या ताज्या सार्वकालीन शिखरावर पोहोचला. ‘सेन्सेक्स’ची ७८ हजार अंशाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २३,६६४ या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचला. मात्र दिवसअखेर तो ४१.९० अंशांच्या घसरणीसह २३,५१६ या नकारात्मक पातळीवर विसावला.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
moody forecasts indian economy
मूडीजला ७.२ टक्के अर्थवेगाचा विश्वास
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले

हेही वाचा : व्होडाफोनकडून इंडस टॉवर्समधील १८ टक्के भागभांडवल १५,३०० कोटींना विक्री

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची चिन्हे दिसत नसली तरी तिची गती मंदावण्याची शक्यता आहे. दुसरीकडे निवडणुकांना सामोरे जात असलेल्या फ्रान्समधील वाढता राजकीय तणाव आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून विद्यमान वर्षात डिसेंबरपर्यंत व्याजदर कपात लांबणीवर पडण्याचे संकेत असल्याने जागतिक बाजारात संमिश्र वातावरण होते. त्याचेच पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटल्याने निर्देशांक उच्चांकी पातळीपासून खाली आले, असे मत एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख दीपक जसानी यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँक, इंडसइंड बँक, स्टेट बँक, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्र आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजचे समभाग तेजीसह बंद झाले. तर दुसरीकडे, टायटन, मारुती, भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि पॉवर ग्रिडच्या समभागात घसरण झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारी २,५६९.४० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

हेही वाचा : Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

सेन्सेक्स ७७,३३७.५९ ३६.४५ ( ०.०५%)
निफ्टी २३,५१६ -४१.९० (-०.१८%)
डॉलर ८३.४४ १ पैसा
तेल ८५.१४ -०.२२