लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती आले असून सध्या एनडीए २५० हून जास्त जागांवर आघाडीवर तर इंडिया आघाडी २०० हून जास्त जागांवर आघाडीवर आहे. याच दरम्यान शेअर बाजार उघडले असून बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स व निफ्टी दोन्हीत घसरण झाली आहे.

शुक्रवारी (१ जून रोजी) एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाल्यानंतर सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळली होती. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी एनडीएच्या बाजूने बहुमत असेल, असे अंदाज वर्तविले होते. पण मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आज ४ जून रोजी सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. निकालाच्या दिवशीच शेअर बाजाराने लाल निशाण दाखवलं आहे. सेन्सेक्स १५०० अकांच्या घसरणीसह उघडला. सुरुवातीला १३४२ अंकांची घसरण होती ती वाढून १५०० वर पोहोचली. दुसरीकडे निफ्टीही ८४ हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला आणि त्यात आणखी घसरण झाली. आतापर्यंत निफ्टी ५३९ अंकांपेक्षा अधिक घसरून २२,७२४.८० वर पोहोचला आहे.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
rbi monetary policy rbi keeps repo rates unchanged reserve bank predicts rising inflation
व्याज दरकपात नाहीच!‘जीडीपी’वाढीच्या अपेक्षांना कात्री; महागाईचा ताप चढण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज
buldhana district mla
बुलढाणा : हो खरंय; करोडपती आमदार मतदानानंतर ‘लखोपती’!
jalgaon evm machines
जळगावमध्ये ईव्हीएम विरोधात मोर्चा
stock market update sensex rises over 597 points to settle at 80845 nifty surge 181 points close at 24457
Stock Market Updates : सेन्सेक्सला बळ; रुपया अशक्त

 राज्यात महाविकास आघाडीला ३०, तर महायुतीला १७ जागांवर आघाडी; प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

सेन्सेक्समध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. आता सेन्सेक्समध्ये आणखी घसरण झाली आहे. तो २५०० अंकांनी घसरला असून सध्या ७३,७७५.७० वर ट्रेंड करत आहे.

पीएसयू बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

सकाळी १० वाजता निफ्टीवरील पीएसयू बँकेचे शेअर्स सुमारे ६ टक्क्यांनी खाली आले आहेत. बँक ऑफ बडोदाचे शेअर्स सात टक्क्यांनी घसरले आहेत. पीएनबी, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक यांचे शेअर्स ६ टक्क्यांनी घसरले आहेत. सोमवारी जबरदस्त कामगिरी करणाऱ्या एसबीआयचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरले आहेत.

अपेक्षित जागा न मिळाल्यास इंडिया आघाडी काय करणार? ‘हा’ असेल निकालानंतरचा प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन, काँग्रेसने सर्व वरिष्ठ नेत्यांना…

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १०.३२ लाख कोटी रुपयांची घट

३ जून २०२४ रोजी बीएसईवर सूचीबद्ध सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप ४,२५,९१,५११.५४ कोटी होते. आज म्हणजेच ४ जून २०२४ रोजी बाजार उघडताच त्यात घसरण झाली. घसरणीनंतर मार्केट कॅप आता ४,१५,५९,१७४.७० कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १०,३२,३३६.८४ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

सेन्सेक्स तीन हजारांहून अधिक अंकांनी कोसळला आहे. सध्या सेन्सेक्स ३१३१ अंकांच्या घसरणीसह ७३,३३६.६६ वर व्यापार करत आहे.

शेअर बाजारातील घसरण सातत्याने सुरूच असून सेन्सेक्स ४२०० हून जास्त अंकांनी कोसळला आहे, तर निफ्टीमध्ये १४०० अंकांची घसरण झाली आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Story img Loader