मुंबई : जागतिक बाजारातील नरमाईच्या परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात बँकिंग, वित्तीय कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या विक्रीच्या माऱ्याने ‘सेन्सेक्स’मध्ये बुधवारी ४०० अंशांहून अधिक घसरण झाली. परदेशी गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) समभाग विक्रीचा अविरत मारा आणि कंपन्यांच्या असमाधानकारक तिमाही आर्थिक कामगिरीने गुंतवणूकदारांना निराश केले.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४२६.८५ अंशांची घसरण झाली आणि तो ७९,९४२.१८ पातळीवर स्थिरावला. सत्रादरम्यान, निर्देशांकाने ८०,४३५.६१ हा उच्चांक आणि ७९,८२१.९९ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२६ अंशांनी घसरून २४,३४०.८५ पातळीवर बंद झाला. मात्र परदेशी गुंतवणूकदारांच्या समभाग विक्रीत झालेली घट आणि देशांतर्गत समभागांच्या मूल्यांकनात थोडी सुधारणा हे भारतीय भांडवली बाजारासाठी सकारात्मक संकेत आहेत, असे बाजार विश्लेषकांनी सांगितले.

हेही वाचा :China’s Richest Zhang Yiming’s Wealth : चीनच्या सर्वांत श्रीमंत व्यक्तीची संपत्ती माहितेय का? मुकेश अबांनींच्या तुलेनत…

परकीयांच्या आक्रमक विक्रीमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबला आहे. आगामी काळात अमेरिकेतील निवडणुका, अर्थव्यवस्थेविषयक आकडेवारी आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयायावर बाजाराची पुढील चाल निश्चित होईल. देशांतर्गत कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीतील कमकुवत आकडेवारीने गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा पडली आहे. मात्र कंपन्यांचे मूल्यांकन सध्या मध्यम पातळीवर स्थिरावत आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँक, महिंद्र अँड महिंद्र, स्टेट बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज, ॲक्सिस बँक, एनटीपीसी आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात घसरण झाली. तर या पडझडीतही मारुती, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, आयटीसी आणि अल्ट्राटेक सिमेंटची कामगिरी चमकदार राहिली.

हेही वाचा : सोन्याच्या भाववाढीमुळे ग्राहकांचा आखडता हात, धनत्रयोदशीला गेल्या वर्षाइतकीच २० टनांपर्यंत विक्री अपेक्षित

सेन्सेक्स ७९,९४२.१८ -४२६.८५ (-०.५३%)

निफ्टी २४,३४०.८५ -१२६ (-०.५२%)

डॉलर ८४.०९ ४

तेल ७१.५७ ०.६३