अमेरिकेतली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्यापासूनच मुंबई शेअर बाजारामध्ये नकारात्मक वातावरण पाहायला मिळू लागलं आहे. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार हे स्पष्ट झाल्यानंतर मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टीनंही माघार घेतल्याचं चित्र दिसून आलं होतं. सोमवारी रात्री अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम करणारे काही महत्त्वाचे निर्णय घेतले. याचा परिणाम मंगळवारी सकाळी शेअर मार्केटमध्ये व्यवहार सुरू होताच दिसून आला. मुंबई शेअर मार्केटमध्ये मंगळवारची सकाळ गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सेन्सेक्स कोसळला, निफ्टीनंही तोच रस्ता धरला!

मंगळवारी सकाळी सेन्सेक्स तब्बल ७०० हून अधिक अंकांनी आपटल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले. व्यवहार सुरू झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी काहीसं सकारात्मक चित्र निर्माण झालं. निफ्टी ५० सकाळच्या सत्रात ६४ अंकांनी वधारला तर सेन्सेक्सही ७६.४४ अंकांनी वर आला. पण अवघ्या काही वेळातच गुंतवणूकदारांच्या आशा धुळीस मिळाल्या. सेन्सेक्स तब्बल ७०० अंक अर्थात ०.९३ टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ निफ्टी ५० देखील ७४ टक्के अर्थात १७२ अंकांनी घसरून २३ हजार १७२.७० पर्यंत खाली आला. बिझनेस टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचं तब्बल ५.५ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

दरम्यान, या पडझडीमध्ये झोमॅटो, अदाणी पोर्ट्स, एसबीआय, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सचे घसरलेले दर सर्वाधिक कारणीभूत ठरले. अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, एचसीएल टेक, एशियन पेंट्स आणि नेसले इंडिया या कंपन्यांच्या शेअर्सचे दर काहीसे वधारल्यामुळे गुंतवणूकदारांना एकीकडे आर्थिक फटका बसत असताना दुसरीकडे काहीसा दिलासा मिळत होता.

शेअर मार्केटमध्ये एकीकडे काही कंपन्यांचे शेअर्स नीचांक नोंदवत असताना जवळपास ९१ शेअर्सनं ५२ आठवड्यांतील उच्चांक नोंदवला. नीचांक नोंदवलेल्या कंपन्यांची संख्या ४१ च्या घरात आहे. मुंबई शेअर बाजाराचा विचार करता आज सकाळपासून झालेल्या व्यवहारात एकूण ३ हजार ८९० शेअर्सची खरेदी-विक्री झाली. त्यातील १२४२ शेअर्स हे ग्रीन मार्कवर दिसून आले,. तर त्याचवेळी २४६७ शेअर्स हे रेड मार्कवर पाहायला मिळाले. उर्वरीत शेअर्सच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत.