Stock Market Today: मुंबई शेअर बाजारात मंगळवारी सकाळच्या सत्रातले व्यवहार सुरू होताच गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला. आजतागायत पहिल्यांदाच Sensex नं ८५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सनं ८५,०४३.४४ अंकांपर्यंत उसळी घेतली. गुंतवणूकदारांचा या पहिल्या उसळीमध्येच कोट्यवधींचा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मुंबई शेअर बाजारात मंगळवारची सकाळ गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवणारी ठरली.
सकाली १० च्या सुमारास सेन्सेक्सनं ८५ हजारांचा टप्पा ओलांडला. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदरांमध्ये तब्बल ५० पॉइंटने घट केल्याचा परिणाम मुंबई शेअर बाजारात पाहायला मिळत असल्याचं जाणकारांचं मत आहे.
Nifty50 चीही विक्रमी कामगिरी!
दरम्यान, Sensex प्रमाणेच निफ्टी५०नंही विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. निफ्टीनं आजपर्यंतची सर्वोच्च पातळी गाठत २५,९७८.९० अंकांची नोंद केली आहे.
Sensex: विश्लेषण : उच्चांकी पातळीवर पोहोचलेला मुंबई शेअर बाजार ‘सेन्सेक्स’ पुन्हा का कोसळला?
अमेरिकन फेडरल बँकेकडून व्याजदरांमध्ये कपात केल्यापासून भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. १८ सप्टेंबर रोजी फेडरल बँकेनं ०.५ टक्क्यांनी व्याजदरांमध्ये कपात केली. २०२०च्या पहिल्या तिमाहीनंतर गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून व्याजदरांमध्ये कपात करण्यात आली आहे.