Sensex update in BSE: सोमवारी शेअर बाजारानं गुंतवणूकदारांना आस्मान दाखवत तब्बल अडीच हजारांची घसरण नोंदवली. सेन्सेक्ससह निफ्टीनंही आपटी खाल्ल्यानंतर लाखो गुंतवणूकदार हवालदील झाले होते. मात्र, मंगळवार आणि पाठोपाठ आज बुधवारीही शेअर बाजारानं गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. कालप्रमाणेच आजही सकाळच्या सत्रात शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्सनं तर सुरुवातच १ टक्के वाढीसह केल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही नुकसानभरपाईची वेळ ठरली. त्यापाठोपाठ निफ्टीनंही २९६ अंकांची भर घातली.

बुधवारी मुंबई शेअर बाजार उघडला तेव्हा Sensex ७९,३५३ वर उघडला. त्यापाठोपाठ निफ्टीनंही २९६ अंकांची भर घालत २४,२८९ पर्यंत मजल मारली. शेअर बाजारातील या तेजीमुळे बाजाराचं एकूण भांडवली मूल्य पहिल्याच सत्रात ४.५३ लाख कोटींनी वाझून ४४४.१२ लाख कोटींवर पोहोचलं.

stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sensex drops 110 points nifty settles at 23532
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
Democracy media What the audience expects from the media
प्रसारमाध्यमे खरे प्रश्न मांडणार, की आक्रस्ताळ्या चर्चाच दाखवत राहणार?
Western Railway service disrupted mumbaiu print news
पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली
bombay stock exchange today sensex update
मुंबई शेअर बाजारात आज सकारात्मक सुरुवात! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Sensex ला कुणाचा हातभार?

आज सेन्सेक्सनं घेतलेल्या उसळीसाठी इन्फोसिस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स वधारल्यामुळे सेन्सेक्सची वेगात घोडदौड झाली. याशिवाय आयटीसी, टीसीएस, एल अँड टी, अॅक्सिस बँक आणि एसबीआयनंही मोठा हातभार लावला. ऑटो, फायनान्स, एफएमसीजी, आयटी, माध्यम, मेटल उद्योग, फार्मा, रिअॅलिटी व्यवसाय, हेल्थकेअर आणि ऑईल-गॅस क्षेत्रामध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली.

Sensex Today: गुंतवणूकदारांना सेन्सेक्स ‘पावला’; सोमवारच्या धक्क्यानंतर दिला मदतीचा हात; मागोमाग निफ्टीचाही पुढाकार!

इंडेक्सेशनसंदर्भातील चर्चेमुळे रिअॅल्टी क्षेत्रात उभारी

दरम्यान, रिअॅल्टी क्षेत्रातील इंडेक्सेशनच्या चर्चेमुळे या क्षेत्रातील शेअर्सला उभारी मिळाल्याचं बोललं जात आहे. इंडेक्सेशनमुळे मालमत्ता व्यवहारावर जास्त कर भरावा लागत असल्यामुळे केंद्र सरकार याबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार करदात्यांसाठी दोन पर्याय दिले जातील. इंडेक्सेशनशिवाय १२.५ टक्के एलटीसीजी कर भरण्याचा पहिला पर्याय, तर इंडेक्सेशनसह २० टक्के एलटीसीजी भरण्याचा दुसरा पर्याय. २३ जुलै २०२४ पूर्वी खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तांसाठी हे बदल लागू असतील, अशीही चर्चा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण लवकरच यासंदर्भातला प्रस्ताव संसदेत मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.