Sensex Updates: गेल्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात सातत्याने वरच्या दिशेनं चाललेला प्रवास आज काहीसा अडखळल्याचं दिसून आलं. एकीकडे सोन्याच्या दरांमध्ये तेजी दिसत असताना इतके मुंबई शेअर मार्केटमध्ये मात्र गुरुवारी वातावरण नरमाईचं दिसून आलं. सकाळी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्सनं हाराकिरी केली आणि थेट ८००हून अधिक अंकांची मोठी घसरण नोंदवली. एरवी सेन्सेक्स वर गेला की त्याच्या पाठोपाठ जाणाऱ्या निफ्टीनं याहीवेळी सेन्सेक्सचीच वाट धरत खालच्या दिशेनं केलेला प्रवास गुंतवणूकदारांच्या काळजीत भरच टाकणारा ठरला.

काय घडलंय गुरुवारी सकाळच्या सत्रात?

गुरुवारी सकाळी शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल ८४५ अंकांनी खाली घसरला. त्यामुळे सकाळच्या सत्रात Sensex चे व्यवहार ८३,४२१.१० अंकांच्या आसपास चालू होते. आजची सेन्सेक्सची घसरण एकूण आकड्याच्या जवळपास १ टक्के असल्याचं दिसून आलं.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
bse sensex declined by 236 points
सेन्सेक्सची २३६ अंशांनी माघार
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Gold Silver Rate Today 9 December 2024
Gold Silver Rate Today : आज सोनं स्वस्त झालं की महाग!आठवड्याभरात दरात नेमकं काय झाले बदल? जाणून घ्या

निफ्टीनंही ठेवलं सेन्सेक्सच्या पावलावर पाऊल!

इकडे सेन्सेक्सनं खालचा रस्ता धरल्यानंतर तिकडे निफ्टीनंही आपण सेन्सेक्ससोबतच असल्याचा कित्ता गिरवला. सेन्सेक्सच्या १ टक्क्यापुढे निफ्टीनं १.०५ टक्क्यांची घसरण दाखवत तब्बल २७० अंकांचा उलटा प्रवास करत २५,५५० चा आकडा गाठला.

आगामी दिवसांमध्ये तेजीचा अंदाज?

दरम्यान, आर्थिक वर्षाची दुसरी तिमाही संपली असून कंपन्यांकडून तिमाहीपूर्व अंदाजांसंदर्भात घोषणांची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद शेअर बाजारावर दिसण्याचा अंदाज आहे. मात्र, त्याचवेळी अमेरिकेतील आर्थिक स्थिती, नोकरकपात आणि उत्पादन क्षेत्रात वेगाने होणारे बदल, यांचाही परिणाम भारतीय बाजारपेठेवर होणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये आयटी आणि बँकिंग क्षेत्राच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल.

अमेरिकी बाजारपेठेत काय स्थिती?

अमेरिकेतील शेअर बाजारात परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नसली तरी टेक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सनं तेथील बाजारपेठेला मदतीचा हात दिल्याचं दिसत आहे. तिकडे जपानमध्ये नवीन पंतप्रधानांनी तेथील चलनाबाबत नोंदवलेल्या निरीक्षणांनंतर स्थानिक बाजारपेठेत शेअर्सचे दर वाढल्याचं पाहायला मिळालं. मात्र, मध्य-पूर्व आशियातील देशांमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती असल्यामुळे त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतींवर झाल्याचं दिसून येत आहे.

Story img Loader