नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
देशाच्या सेवा क्षेत्राच्या सक्रियतेने सरलेल्या डिसेंबरमध्ये चार महिन्यांतील उच्चांकी स्तर गाठला. नवीन व्यवसायात वाढ, कार्यादेशांची भक्कम स्थिती आणि महागाईचा ताप कमी झाल्यामुळे सेवा क्षेत्राला गती मिळाल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणाने स्पष्ट केले. भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक डिसेंबर महिन्यात ५९.३ गुणांवर नोंदला गेला. नोव्हेंबरमध्ये हा गुणांक ५८.४ वर होता. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये सेवा क्षेत्रातील क्रियाकलापात वाढ झाली, इतकेच नाही तर निर्देशांकाचा हा चार महिन्यांतील उच्चांकी स्तर आहे. सेवा क्षेत्राचा निर्देशांक ५० गुणांवर नोंदला गेल्यास विस्तार, तर तो ५० गुणांखाली गेल्यास आकुंचन झाल्याचे मानले जाते.
कार्यादेशातील वाढ कायम राहिल्याने नवीन व्यवसायात गेल्या महिन्यात वाढ नोंदविण्यात आली. यामुळे सेवा आस्थापनांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांनी अतिरिक्त मनुष्यबळ भरती केल्याचे सर्वेक्षणाने नमूद केले आहे.गेल्या महिन्यात सेवा क्षेत्रावरील किमतीचा ताणही कमी झाला आहे. मात्र खाद्य घटक, कामगारांचे वेतन आणि साहित्य यांच्या महागाईतील वाढ कायम आहे. याचवेळी विक्री किमतीवरील महागाईचा दबाव शिथिल झाला. यामुळे एकूण व्यवसासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले. औद्योगिक उत्पादनात घसरण होत असताना सेवा क्षेत्राची वाढीचा वेग कायम असल्याचे सर्वेक्षण दर्शविते.
आगामी चित्र आशादायी
भारतीय सेवा क्षेत्राची सक्रियता डिसेंबरमध्ये चार महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली. सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी याबाबत आशादायी चित्र मांडले आहे. नवीन व्यवसायात भविष्यात वाढ होऊन सेवा क्षेत्राची कामगिरी भक्कम राहणे अपेक्षित आहे, असे एचएसबीसी इंडियाचे
अर्थतज्ज्ञ, – इनेस लॅम म्हणाले.