२०२३ च्या उत्तरार्धात ई-कॉमर्स उद्योगात सात लाख नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. कारण सणासुदीच्या काळात ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी कंपन्या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सणासुदीच्या काळात गिग जॉबची संख्या वाढणार

स्टाफिंग कंपनी टीमलीज सर्व्हिसेसने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ई-कॉमर्स कंपन्या सणासुदीच्या अगोदर वार्षिक खरेदीच्या वेळी ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सज्ज आहेत. अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सणासुदीच्या हंगामात तात्पुरत्या कर्मचाऱ्यां (gig job)च्या संख्येत २५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

हेही वाचाः Money Mantra : अवघ्या २० रुपयांत मिळणार २ लाखांचे विमा संरक्षण, कसा घेता येणार ‘या’ सरकारी योजनेचा लाभ?

‘या’ शहरांमध्ये तात्पुरत्या कामगारांची मागणी वाढणार

ई-कॉमर्स उद्योग दृष्टिकोनाबद्दल खूप आशावादी आहे. सणासुदीच्या काळात हंगामी कामगारांची मागणी केवळ बंगळुरू, दिल्ली, मुंबई यांसारख्या टियर-१ शहरांमध्येच नाही तर वडोदरा, पुणे आणि कोईम्बतूर यांसारख्या टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्येही वाढेल. मोठ्या शहरांपेक्षा लहान शहरांमध्ये वेअरहाऊस ऑपरेशन्स, लास्ट माईल डिलिव्हरी आणि कॉल सेंटर ऑपरेशन्सना अधिक मागणी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील अपेक्षित मागणी आहे.

हेही वाचा : Money Mantra : प्राप्तिकर रिटर्न वेळेवर भरता आला नाही; किती नुकसान होणार? आता उपाय काय?

पुढील २-३ वर्षांत तात्पुरत्या कामगारांची मागणी वाढणार: बालसुब्रमण्यम

टीमलीज सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष बालसुब्रमण्यम म्हणतात की, गेल्या पाच वर्षांपासून कामगारांची मागणी वार्षिक आधारावर २० टक्क्यांनी वाढत आहे आणि ही वाढ पुढील २-३ वर्षांपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. विशेषतः ई-कॉमर्स क्षेत्रात गिग कामगारांची मागणी कायम राहणार आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven lakh jobs will be created in the e commerce industry vrd
Show comments