मुंबई: भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक गुरुवारच्या सत्रात व्यवहार मंदावण्यासह, मर्यादित श्रेणीत व्यवहार करत स्थिरावले. देशांतर्गत तसेच जागतिक स्तरावरून बाजाराला स्फुरण देणाऱ्या घडामोडी, संकेत नसल्याने बाजार व्यवहारही सुस्तावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह ७८,४७२.४८ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात ४२५.५ अंशांची कमाई करत त्याने ७८,८९८.३७ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २२.५५ अंशांची वाढ झाली आणि तो २३,७५०.२० पातळीवर बंद झाला.

हेही वाचा – रुपयाचे मूल्य आणखी खोलात!

वर्षसांगतेची करार समाप्ती, देशांतर्गत भांडवली बाजारातील सुट्यांमुळे निर्देशांक मर्यादित पातळीत व्यवहार करत स्थिरावले. अलीकडील घसरणीमुळे मात्र वाहन निर्मिती कंपन्यांच्या समभागांना मागणी दिसून आली. मात्र परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा आणि घसरणारा रुपया याविषयी चिंता कायम आहे. मजबूत होत असलेला अमेरिकी डॉलर निर्देशांक आणि आगामी वर्ष २०२५ मध्ये व्याजदर कपातीच्या शक्यता कमी झाल्याने बाजारात निराशेचे वातावरण होते, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टायटन, एशियन पेंट्स, नेस्ले, टेक महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, झोमॅटो, लार्सन अँड टुब्रो आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. तर अदानी पोर्ट्स, महिंद्र अँड महिंद्र, मारुती, सन फार्मा, भारती एअरटेल आणि टाटा मोटर्सचे समभाग तेजीसह स्थिरावले.

हेही वाचा – रिझर्व्ह बँकेची ‘एआय’च्या वापरासाठी समिती, वित्तीय क्षेत्रात जबाबदार अन् नैतिक वापरासाठी चौकट आखणार

सेन्सेक्स ७८,४७२.४८ – ०.३९ (०० टक्के)

निफ्टी २३,७५०.२० – २२.५५

डॉलर ८५.२७ – १२ पैसे

तेल ७३.९७ – ०.५३ टक्के