मुंबई: देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन २०२५ वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने केली आहे. सलग दोन सत्रात घसरण झिडकारत, बुधवारच्या सत्रात ६०० हून अधिक अंशांची उसळी घेणाऱ्या सेन्सेक्सला ‘ब्लू चीप’ कंपन्यांमधील समभाग खरेदीने स्फुरण दिले. नववर्षाच्या पहिल्या सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३६८.४० अंशांनी वधारून तो ७८,५०७.४१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ६१७.४८ अंशांची कमाई करत ७८,७५६.४९ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९८.१० अंशांची वाढ झाली आणि तो २३,७४२.९० पातळीवर बंद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रमुख पायाभूत क्षेत्रांमधील तीन महिन्यांतील सर्वोत्तम वाढ आणि केंद्र सरकारकडून आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीत मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च केला जाण्याच्या शक्यतेतून, भांडवली वस्तू, उद्योग, वाहन निर्मिती आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसायात चांगल्या वाढीची अपेक्षा आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

हेही वाचा : गूगलपे, फोनपेला ‘एनपीसीआय’कडून दिलासा

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये मारुती, महिंद्र अँड महिंद्र, लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक वधारले. तर टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, झोमॅटो, एचसीएल टेक, स्टेट बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि टेक महिंद्रच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रघाताप्रमाणे, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारच्या सत्रात ४,६४५.२२ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली होती.

हेही वाचा : डिसेंबरमध्ये जीएसटी संकलन १.७७ लाख कोटींवर

सरलेले कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये सेन्सेक्सने ५,८९८.७५ अंशांची म्हणजेच ८.१६ टक्क्यांची कमाई केली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १,९१३.४ अंशांची (८.८० टक्के) भर घातली.

सेन्सेक्स ७८,५०७.४१ ३६८.४० ( ०.४७%)

निफ्टी २३,७४२.९० ९८.१० ( ०.४१%)

डॉलर ८५.६४ ००

तेल ७४.६४ ०.८८