मुंबई : जागतिक बाजारातील मजबूत कल आणि बँकिंग, ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर स्थिरावले. कोणत्याही मोठ्या घटनेच्या अभावी आणि परकीय निधीचा मोठा ओघ नसूनदेखील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने १४० अंशांची कमाई केली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४४.३१ अंशांनी वधारून ८१,६११.४१ वर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ३५३.७४ अंशांची कमाई करत ८२,००२.८४ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १६.५० अंशांची किरकोळ वाढ झाली. मात्र तो २५,००० अंशांच्या महत्त्वाच्या पातळीवर टिकून राहण्यास अयशस्वी ठरला. अखेर तो २४,९९८.४५ पातळीवर बंद झाला.

हेही वाचा : इक्विटी म्युच्युअल फंडातील ओघ घटला, सप्टेंबरमध्ये ३४,४१९ कोटींची भर; थीमॅटिक, लार्ज कॅप फंडांकडे ओढा

टीसीएसच्या माध्यमातून दुसऱ्या तिमाहीत कामगिरीच्या हंगामाची सुरुवात झाली आहे. जागतिक पातळीवर आशियाई बाजारांनी चांगली सुरुवात केली. मात्र अमेरिकेत महागाई वाढीच्या चिंतेने युरोपियन बाजारांमध्ये घसरण झाल्याने सकाळच्या सत्रातील फायदा टिकवून ठेवता आला नाही, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी कोटक महिंद्र बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी, एनटीपीसी, ॲक्सिस बँक आणि महिंद्र अँड महिंद्र यांचे समभाग तेजीसह स्थिरावले. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा केमिकल्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेस या कंपन्यांचे शेअर्स गुरुवारी १५ टक्क्यांपर्यंत वधारले होते. तर टेक महिंद्र, सन फार्मास्युटिकल्स, इन्फोसिस, टायटन, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) समभागात मात्र घसरण झाली.

हेही वाचा : एअर इंडियाद्वारे एअरबस, बोईंगकडून विमान खरेदी

सेन्सेक्स ८१,६११.४१ १४४.३१

निफ्टी २४,९९८.४५ १६.५०

डॉलर ८३.९८ २

तेल ७७.६३ १.३७