मुंबई : जागतिक पातळीवरील मजबूत कल आणि अर्थव्यवस्थेची सुदृढता दर्शविणाऱ्या सकारात्मक आकडेवारीच्या जोरावर भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने ७२,००० अंशांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आणि निफ्टीने नवी विक्रमी उच्चांकी पातळी गाठली. गुंतवणूकदारांच्या व्यापक उत्साहाचे प्रतिबिंब निफ्टी निर्देशांकावर उमटले. धातू, कमॉडिटी, वाहन निर्मिती आणि बँकिंग या क्षेत्रांतील तीव्र खरेदीमुळे निफ्टी २१,६५४.७५ च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बचतीसाठी बहुसंख्यांचे बँक ठेवी, सोन्याला प्राधान्य

सलग चौथ्या सत्रात वाढ होऊन, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ७०१.६३ अंशांची उसळी मारून ७२,०३८.४३ या उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ७८३.०५ अंशांची झेप घेत ७२,११९.८५ या नवीन शिखराला स्पर्श केला. निफ्टी २१३.४० अंशांनी वधारून २१,६५४.७५ या विक्रमी उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने २३४.४ अंशांची झेप घेत २१,६७५.७५ ही उच्चांकी पातळी गाठली.

सलग चौथ्या सत्रातील वाढीने देशांतर्गत बाजार निर्देशांकांनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आणि गेल्या आठवड्यातील तोटा सहज भरून काढला. त्या आधी अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हकडून लवकर दर कपातीच्या अपेक्षेने आणि जागतिक चलनवाढ मंदावल्याने एकूणच निर्देशांकांना चालना मिळाली, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा >>> अतनु चक्रवर्ती एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षपदी कायम राहणार, बोर्डानं ३ वर्षांच्या मुदतवाढीला दिली मंजुरी

सेन्सेक्समध्ये अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, स्टेट बँक, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे, एनटीपीसी आणि टेक महिंद्रच्या समभागात मात्र घसरण झाली.

सेन्सेक्स ७२,०३८.४३ ७०१.६३ ( ०.९८)

निफ्टी २१,६७५.७५ २३४.४ ( १.००)

डॉलर ८३.३५ १६ तेल ८०.९० ०.२१

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share market update sansex cross 72000 mark nifty close at all time high print eco news zws
Show comments