मुंबई: कोणत्याही चैतन्य देणाऱ्या घटकाअभावी मोठ्या चढ-उतारासह अत्यंत नीरस राहिलेल्या व्यवहारात मंगळवारी भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक नाममात्र फरक नोंदवत बंद झाले. विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचे सातत्य कायम राहिल्याने प्रारंभिक सत्रात सेन्सेक्स-निफ्टीने केलेली कमाई पूर्णपणे धुवून काढली.

हेही वाचा >>> कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड

खाली-वर हिंदोळे दिवसभर सुरू राहिल्यानंतर, सेन्सेक्स दिवसअखेरीस ६७.३० अंश (०.०९ टक्के) नुकसानीसह ७८,४७२.८७ या पातळीवर बंद झाला. सकाळच्या सत्रात निर्देशांक ३३७ अंशांच्या कमाईसह ७८,८७७ अंशांच्या उच्चांकापर्यंत झेपावला होता. तथापि मध्यान्हानंतर सेन्सेक्समध्ये घसरण सुरू झाली आणि एकेसमयी तो १४२.३८ अंशांच्या घसरणीसह ७८,३९७.७९ वर घरंगळला होता. एकंदर बाजाराला अस्थिरतेने घेरले असले तरी जेमतेम ५०० अंशांच्या अरुंद पट्ट्यात सेन्सेक्सची हालचाल सीमित होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३,७२७.६५ वर स्थिरावला आणि दिवसअखेरीस त्यातील घसरण २५.८० अंश (०.१८ टक्के) अशी होती.

trade war Nifty news in marathi
मोठ्या आपटीतून सावरला, तरी ‘सेन्सेक्स’चे ३१९ अंशांचे नुकसान ; व्यापार युद्धाच्या धास्तीने जागतिक बाजारात मात्र मोठी पडझड
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Indian Share Market
गुंतवणूकदारांनी ५ मिनिटांत गमावले ५ लाख कोटी रुपये, शेअर बाजार उघडताच Sensex ७०० अंकांनी आपटला
PMP bus, Pune, PMP, pune PMP news
पुणे : पीएमपी बंद पडण्याच्या प्रमाणात घट
bombay stock exchange update Sensex nifty share market points
Market roundup : शेअर बाजारात ‘सेन्सेक्स’ची ९०० अंशांची फेरउसळी; बाजारातील तेजीचे तीन मुख्य घटक कोणते?
70% of BSE500 stocks are in a bear phase; investors consider buying the dip before Union Budget 2025.
BSE500 मधील ७० टक्के शेअर्स मंदीच्या टप्प्यात, अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूक करणे योग्य ठरणार का?
sensex plunges 325 points at the end of the week reasons behind stock market
Marker Roundup: शेअर बाजारात सप्ताहअखेर सेन्सेक्सला ३२५ अंशांची गळती; जाणून घ्या घसरणीची कारणे
sensex BSE share market Nifty mid cap small cap
Market Roundup : शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्सची आगेकूच; मूडपालटाची कारणे काय?

हेही वाचा >>> रुपया सलग सहाव्या सत्रात नवीन तळ गाठत प्रति डॉलर ८५.२० नीचांकाला

सेन्सेक्समधील १४ समभाग वधारले, तर १६ घसरणीत राहिले. निफ्टीतही वाढ-घसरणीचे प्रमाण २२ विरूद्ध २८ असे होते. मुंबई शेअर बाजारात २,०१९ समभागांचे मूल्य घसरले, तर १,९७७ समभागांचे मूल्य वाढले. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक मात्र अनुक्रमे ०.३७ टक्के आणि ०.०९ टक्के असे वधारले.

बुधवारी नाताळनिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने भांडवली बाजारातील व्यवहार बंद राहतील.

Story img Loader