मुंबई : लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना, भांडवली बाजारात निकालासंबंधाने तेजीवाल्या आणि मंदीवाल्यांमध्ये चांगली जुंपली असून, त्या परिणामी दिवसाच्या व्यवहार सत्रात सुरू असलेल्या चढ-उतारांचा अनुभव मंगळवारच्या सत्रानेही दिला. वरच्या स्तरावर म्हणूनच गुंतवणूकदार नफावसुलीला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> जनसामान्यांची सुमारे १.९१ लाख कोटींची संपत्ती दाव्याविना पडून; बँक ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड, पीएफचा प्रचंड पैशाला हक्कदारच नाही!

मंगळवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी ऊर्जा, इंधन आणि भांडवली वस्तूंशी संबंधित कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा केला. परिणामी प्रमुख निर्देशांकांमध्ये सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. विश्लेषकांच्या मते, सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांपूर्वी अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात ‘बाइंग ऑन डीप आणि सेल ऑन रॅली’ या सूत्राचे गुंतवणूकदारांकडून अनुसरण होत असल्याचे दिसत आहे. परिणामी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २२०.०५ अंशांनी घसरून ७५,१७०.४५ पातळीवर बंद झाला. दिवसभरात, त्याने ७५,५८५.४० अंशांची उच्चांकी तर ७५,०८३.२२ अंशांचा नीचांक गाठला होता. दिवसाची सुरुवात सकारात्मक होऊनही, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४४.३० अंशांची घसरण झाली आणि तो २२,८८८.१५ पातळीवर स्थिरावला.

हेही वाचा >>> ‘पॅन-आधार’ची जोडणी ३१ मेपर्यंत अनिवार्य, अन्यथा दुप्पट टीडीएसचा भुर्दंड

भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकांनी सोमवारच्या सत्रात ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठल्यानंतर त्यात सौम्य नफावसुली झाली. निवडणूक निकाल जवळ येत असल्याने वाढत्या अनिश्चिततेमुळे नजीकच्या काळात बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांची कामगिरीही निराशाजनक राहिली. तर आगामी काळात औषधनिर्माण आणि ग्राहकोपयोगी उत्पादन ही क्षेत्रे आशावादी राहतील, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिड, एनटीपीसी, टेक महिंद्र, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्र बँक आणि मारुती या कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. तर एशियन पेंट्स, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह आणि महिंद्र अँड महिंद्र या कंपन्यांचे समभाग तेजीत होते.

सेन्सेक्स      ७५,१७०.४५   २२०.०५        (-०.२९%)

निफ्टी          २२,८८८.१५      ४४.३०       (-०.१९%)

डॉलर           ८३.१८             ५

तेल              ८३.२१             ०.१३

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share market update sensex falls 220 point nifty stable below 22900 print eco news zws