मुंबई : देशांतर्गत आघाडीवर महागाईने उसंत घेतल्याचे शुक्रवारी भांडवली बाजारात सकारात्मक पडसाद उमटले. दूरसंचार क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीने प्रमुख निर्देशांकांनी प्रारंभिक घसरणीतून सावरणारी उलटफेर दाखविली.

नोव्हेंबरमध्ये किरकोळ चलनवाढ ५.४८ टक्क्यांपर्यंत नरमली. मुख्यतः खाद्यान्नांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई होण्यास मदत झाली. ऑक्टोबरमध्ये १४ महिन्यांच्या उच्चांकी चढलेला महागाई दर, आता रिझर्व्ह बँकेच्या अनुमानित पातळीपर्यंत खाली आला आहे. यामुळे फेब्रुवारीमध्ये नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीला व्याजदर कमी करण्यास वाव निर्माण केला आहे. या दिलासादायी घडामोडीचे प्रतिबिंब भांडवली बाजारातील व्यवहारांत दिसून आले.

Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : दादरमधल्या हनुमान मंदिरावरुन राजकारण; किरीट सोमय्यांचं रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र, “अनेक दशकं…”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
gold reserves, Dhanteras gold, gold storage, RBI, england
विश्लेषण : १०२ टन सोने इंग्लंडकडून भारताकडे… रिझर्व्ह बँकेच्या ‘सोने वापसी’ निर्णयामागे काय कारण?
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…

सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८४३.१६ अंशांनी वधारून ८२,१३३.१२ पातळीवर स्थिरावला. सकाळच्या सत्रात मागील काही सत्रांतील घसरणीची मालिका सुरू ठेवत तो १,२०७.१४ अंशांनी गडगडला होता. मात्र मध्यान्हानंतर बाजाराचा मूड पालटला आणि सेन्सेक्सने वरच्या दिशेने उभारी घेतली. दिवसाच्या तळापासून तब्बल २,१३४ अंशांची झेप घेत, त्याने ८२,२१३.९३ अंशांच्या उच्चांकालाही गाठले होते. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये सकाळच्या सत्रात ३६७.९ अंशांची घसरण झाली होती. मात्र त्यानेही तळातून उभारी घेत बाजारातील व्यवहार थंडावताना २१९.६० अंशांच्या कमाईसह, २४,७६८.३० पातळीवर बंद नोंदवला.

हेही वाचा >>>सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा

सत्रातील नीचांकी स्थितीतून बाजार जलदगतीने सावरला आणि निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या कंपन्यांच्या जोरावर सेन्सेक्स-निफ्टीने १ टक्क्यांपर्यंत मुसंडी मारली. सर्वाधिक तापदायी ठरलेल्या खाद्यान्न चलनवाढीत घट झाल्याचा ग्राहकोपयोगी वस्तू अर्थात एफएमसीजी कंपन्यांना लाभ झाला. या कंपन्यांनी उत्पादनांच्या किमतीत केलेल्या वाढीमुळे त्यांचे मूल्यांकनही सुधारले आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांकडून त्यांना खरेदीचे पाठबळ मिळाले. वर्षसांगतेला ग्राहक खर्चात वाढ होण्याच्या अपेक्षेने बाजार भावना सकारात्मक राहण्याची आशा आहे. शिवाय, अर्थव्यवस्थेच्या सुधारत असलेल्या स्थितीसह अमेरिकी कंपन्यांकडून खर्चात वाढ होण्याची अपेक्षेने स्थानिक माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

हेही वाचा >>>स्विच मोबिलिटीकडून ‘लो फ्लोअर’ प्रकारात दोन सिटी बस

सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, आयटीसी, कोटक महिंद्र बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि पॉवर ग्रिड हे समभाग सर्वाधिक वधारले. तर टाटा स्टील, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि बजाज फिनसर्व्हच्या समभागात घसरण झाली.

सेन्सेक्स ८२,१३३.१२ ८४३.१६ (१.०४%)

निफ्टी २४,७६८.३० २१९.६० (०.८९%)

डॉलर ८४.७८ -१० पैसे

तेल ७३.७७ ०.५४

Story img Loader