मुंबई: जागतिक भांडवली बाजारातील तेजीचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी एक टक्क्याहून अधिक वधारले. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स आणि इन्फोसिससारख्या ब्लू-चिप कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८१९.६९ अंशांनी म्हणजेच १.०४ टक्क्यांची उसळी घेत ७९.७०५.९१ पातळीवर स्थिरावला. आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २८ कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २५०.५० अंशांची भर घातली आणि तो २४,३६७.५० पातळीवर बंद झाला.

हेही वाचा >>> ‘एलआयसी’चे भाग गुंतवणुकीचे मूल्य १५ लाख कोटींपुढे; सव्वा तीन वर्षात दुपटीहून अधिक वाढ

अमेरिकेतील बेरोजगार भत्त्यासंबंधी दाव्यांची संख्या लक्षणीय घटल्याने, त्या अर्थव्यवस्थेवरील मंदीची भीती कमी झाली आहे. या घडामोडीवर जगभरातील भांडवली बाजारांनी अनुकूल प्रतिक्रिया दिली. गुरुवारी युरोपीय आणि अमेरिकी बाजार लक्षणीय वधारले होते, त्याचे सकारात्मक प्रतिबिंब शुक्रवारी स्थानिक बाजारात उमटले, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी वर्तवले.

सेन्सेक्समधील बहुतांश कंपन्या सकारात्मक पात इन्फोसिस या समभागांमध्ये तेजी दिसून आली. केवळ कोटक महिंद्र बँक आणि मारुतीच्या समभागांत घसरण झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारच्या सत्रात २,६२६.७३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

सेन्सेक्स ७९.७०५.९१ ८१९.६९ (१.०४%)

निफ्टी २४,३६७.५० २५०.५० (१.०४%)

डॉलर ८३.९५ -२

तेल ७९.१८ ०.०३

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share market update sensex jumps 820 points nifty closed above 24365 print eco news zws
Show comments