मुंबई : एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर हे पुन्हा एकदा देशातील सर्वांत दानशूर व्यक्ती ठरले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी २,१५३ कोटी रुपयांचे दान केले आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत या रकमेत ५ टक्के वाढ झालेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एडेलगिव्ह-हुरून इंडिया दानशूरांची यादी गुरूवारी जाहीर झाली. या यादीत शिव नाडर हे यंदाही पहिल्या स्थानी राहिले आहेत. देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी ३३० कोटी रुपयांचे दान केले आहे. याचवेळी देशातील दुसऱ्या क्रमांकांचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी ४०७ कोटी रुपयांचे दान केले आहे. 

हेही वाचा >>>सेवा क्षेत्राच्या निर्देशांकाची ऑक्टोबरमध्ये मुसंडी

मुकेश अंबानी हे यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. अदानी यांनी त्यांचे यादीतील पाचवे स्थान कायम ठेवले आहे. बजाज कुटुंबीय हे यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. त्यांनी ३५२ कोटी रुपयांचे दान केले आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात ३३ टक्के वाढ झालेली आहे. कुमारमंगलम बिर्ला आणि त्यांचे कुटुंबीय हे चौथ्या स्थानी असून, त्यांनी ३३४ कोटी रुपयांचे दान केले आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात १७ टक्के वाढ झाली आहे. 

महिलांमध्ये रोहिणी निलेकणी या प्रथम स्थानी असून, त्यांनी १५४ कोटी रुपये दान केले आहेत. दानशूर व्यक्तींच्या यादीत ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक दान करणाऱ्या २०३ व्यक्तींचा समावेश आहे. एडेलगिव्ह-हुरून इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीनुसार देशात १,५३९ व्यक्ती हे १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेले धनाढ्य आहेत. त्यांची संपत्ती वर्षभरात सुमारे ४६ टक्क्यांनी वाढली आहे.

हेही वाचा >>>डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे गुंतवणूकदारांना असेही लाभ-तोटे!

विरोधाभास म्हणजे, दानशूर व्यक्तींकडून झालेल्या दानात घट नोंदविण्यात आली आहे. दानशूर व्यक्तींच्या यादीतील प्रत्येकाचे सरासरी दान गेल्या आर्थिक वर्षात ४३ कोटी रुपय़ांवर आले आहे. त्याआधीच्या वर्षात या यादीत ११९ व्यक्ती होते आणि त्यांचे सरासरी दान ७१ कोटी रुपये होते.

देशातील दानशूर व्यक्ती

नाव – संपत्ती (लाख कोटी रुपयांत)
शिव नाडर – ३.१४
अनिल अंबानी – १०.१४
गौतम अदानी – ११.६

सर्वाधिक दान (कोटी रुपयांत)

शिक्षण – ३,६८०
आरोग्यसुविधा – ६२६
ग्रामीण विकास – ३३१

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv nadar is the most philanthropic industrialist in the country print eco news amy