हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असेल, परंतु या वातावरणाचा फायदा १२ कंपन्यांना झाला आहे. तपास एजन्सी ईडीच्या म्हणण्यानुसार, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (FPI/FII) सह डझनभर कंपन्यांनी अदाणी शेअर्सच्या शॉर्ट सेलिंगद्वारे प्रचंड नफा कमावला आहे.

ईडीने गेल्या जुलैमध्ये बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) बरोबर शेअर केलेल्या निष्कर्षांमध्ये अनेक दावे करण्यात आले आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालात २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग संशोधन अहवाल प्रकाशित होण्याच्या २-३ दिवस आधी काही शॉर्ट सेलर विक्रेत्यांनी फायदा मिळवला होता.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)

अदाणी ग्रुपच्या शेअर्समधून कमाई करणाऱ्या १२ कंपन्या किंवा संस्थांपैकी तीन भारतातील आहेत. तर चार मॉरिशसमध्ये आणि प्रत्येकी एक फ्रान्स, हाँगकाँग, केमन बेटे, आयर्लंड आणि लंडनमधील आहेत. कोणत्याही FPI/FII ने त्यांच्या मालकीची रचना प्राप्तिकर अधिकार्‍यांकडे उघड केलेली नाही.

हेही वाचाः Money Mantra : ३१ लाख जण अजूनही आयटी रिफंडसाठी पात्र नाहीत, पण का? तुमच्याकडूनही ही चूक झाली आहे का?

कोणत्या भारतीय कंपन्या?

अहवालानुसार, टॉप शॉर्ट सेलरमध्ये दोन भारतीय कंपन्या आणि एका परदेशी बँकेच्या भारतीय शाखेचा समावेश आहे. एक भारतीय कंपनी नवी दिल्लीत तर दुसरी मुंबईत नोंदणीकृत आहे. सेबीने दिल्लीतील नोंदणीकृत कंपनीच्या प्रवर्तकाविरुद्ध गुंतवणूकदारांची दिशाभूल आणि शेअर बाजारात हेराफेरी केल्याप्रकरणी आदेश पारित केला होता.

हेही वाचाः भारतात यंदा गेल्या ८ वर्षांतील सर्वात कमी पाऊस पडण्याची भीती; साखर, डाळी अन् भाज्यांचे भाव वाढण्याची शक्यता

शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?

ही एक गुंतवणूक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदाराला विश्वास असतो की शेअरची किंमत कमी होणार आहे. हे एक प्रकारे सट्टेबाजीसारखे असते. यामध्ये गुंतवणूकदार शेअर्सची किंमत वाढल्यावर ते विकतो आणि त्यानंतर तेच शेअर्स कमी किमतीत परत विकत घेतो. अशा व्यवहारात गुंतवणूकदार नफा कमावतात. विशेष म्हणजे त्याला सेबीची परवानगी आहे. हिंडेनबर्गच्या अदाणी समूहावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या सेबीच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालय लवकरच सुनावणी करणार आहे. सेबीने गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयासमोर तपास अहवाल सादर केला होता. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, सेबीने अदाणी समूहावर ऑफशोअरशी संबंधित काही तांत्रिक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अदाणी समूहाला दंड होऊ शकतो, असा दावाही अहवालात करण्यात आला आहे.

Story img Loader