Show Cause notices IndiGo and Mumbai Airport : आज नागरी उड्डयन मंत्रालयाच्या नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने (BCAS) इंडिगो आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन्ही नोटिसांच्या बाबतीत विमान वाहतूक मंत्रालया (MoCA) ने १६ जानेवारीला म्हणजेच आजच उत्तर मागितले आहे. दिलेल्या मुदतीत उत्तर न दिल्यास आर्थिक दंडासह कार्यवाही सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

खरं तर मुंबई विमानतळावरील डांबरी रस्त्यावर प्रवासी जेवत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल मध्यरात्री मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा

हेही वाचाः Artificial intelligence मुळे जगभरातील ४० टक्के नोकऱ्या धोक्यात, IMFचा इशारा

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये प्रवासी विमानतळाच्या धावपट्टीवर बसलेले दिसत आहेत. यावेळी सर्व प्रवासी धावपट्टीवर बसून अन्न खाताना पाहायला मिळाले. प्रत्यक्षात इंडिगोच्या गोवा-दिल्ली विमानाला १२ तास उशीर झाल्याने मुंबई विमानतळावरील प्रवाशांना धावपट्टीवर बसूनच जेवण करावे लागले.

हेही वाचाः पाकिस्तानातील महागाईने सर्वसामान्यांचे केले हाल; १२ अंडी ४०० रुपयांना, तर कांद्याची किंमत ऐकून डोळे पाणावतील

इंडिगोने माफी मागितली होती

इंडिगोने प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल माफीही मागितली होती. एअरलाइन्सने सांगितले की, ‘आम्हाला १४ जानेवारी २०२४ रोजी गोवा ते दिल्ली येथे इंडिगो फ्लाइट ६ई२१९५ च्या घटनेची माहिती आहे. दिल्लीतील दृश्यमानता कमी असल्याने विमान मुंबईकडे वळवण्यात आले. आम्ही आमच्या ग्राहकांची मनापासून माफी मागतो आणि याकडे लक्ष दिलं आहे.