पीटीआय, नवी दिल्ली

देशात प्रवासी वाहनांच्या विक्रीत मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात २६.७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सेमीकंडक्टर चिपचा (अर्धसंवाहक) कमी झालेला तुटवडा आणि स्पोर्ट युटिलिटी व्हेईकलला (एसयूव्ही) वाढलेली मागणी यामुळे विक्रीत वाढ झाली आहे.

india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Sagar Meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss
‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान

‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)’ या संघटनेने वितरकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील देशातील घाऊक प्रवासी वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली. यानुसार, देशभरात ३९ लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली. त्याआधीच्या आर्थिक वर्षात ही विक्री ३१ लाख होती. मागील वर्षभरात महागाईचा पारा चढता राहिला. मात्र चिपच्या पुरवठ्यात झालेली सुधारणा, उत्पन्नात झालेली वाढ आणि एसयूव्हीची वाढलेली मागणी हे घटक विक्री वाढण्यास कारणीभूत ठरले.

आणखी वाचा- अस्थिर मार्चमध्येही ‘इक्विटी फंडां’त विक्रमी २०,५३४ कोटींचा ओघ

देशात ‘भारत स्टेज-६’ या प्रदूषण मानकांच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी एप्रिलपासून सुरू झाली. त्यामुळे त्याआधी वाहन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला. नवीन मानकांनुसार वाहनांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. यामुळे कंपन्यांनी आधीच वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचे जाहीर केले होते. यामुळे ग्राहकांनी वाहन खरेदी करण्यावर भर दिला. याचबरोबर मागील आर्थिक वर्षात सणासुदीच्या काळात वाहनांना वाढलेली मागणीही एकूण विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यास कारणीभूत ठरली, असे ‘सियाम’ने म्हटले आहे.

देशातील कनिष्ठ ते मध्यम वर्गाच्या उत्पन्नाचा निदर्शक म्हणून दुचाकींच्या विक्रीचा विचार केला जातो. मागील आर्थिक वर्षात दुचाकींच्या विक्रीत १६.९ टक्के वाढ झाली आहे. मार्च महिन्यात एकूण प्रवासी वाहन विक्रीत केवळ ४.५ टक्के वाढ नोंदवण्यात आली, असेही ‘सियाम’च्या आकडेवारीतून समोर आले आहे. दरम्यान, मारूती सुझुकी इंडिया आणि हिरो मोटोकॉर्प या कंपन्यांनी वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. वाढती महागाई, नवीन सुरक्षा आणि प्रदूषण मानके यामुळे किमतीत ही वाढ करण्यात आली आहे.

आणखी वाचा- टीसीएसचा नफा मार्च तिमाहीत १४.८ टक्के वाढीसह ११,३९२ कोटींवर

चालू आर्थिक वर्षात वाढ कमी राहणार

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (एफएडीए) संघटनेकडून वाहनांच्या किरकोळ विक्रीची आकडेवारी जाहीर केली जाते. चालू आर्थिक वर्षात वाहन विक्री कमी राहण्याचा अंदाज संघटनेने या महिन्याच्या सुरुवातीला व्यक्त केला. वाढती महागाई, वाहन उत्पादक कंपन्यांकडून वाढलेल्या किमती आणि नियामकांकडून झालेला बदल यामुळे चालू आर्थिक वर्षात वाहन विक्रीतील वाढ एक आकडी असेल, असे संघटनेने म्हटले आहे.