शेअर बाजार आणि त्यातील घडामोडी याकडे देशभरातल्या कोट्यवधी भागधारकांचं आणि गुंतवणूकदारांचं विशेष लक्ष असतं. कोणत्या कंपनीचे कोणते शेअर किती खाली किंवा वर गेले, यावर अनेकांचं कधी लाखोंचं नुकसान तर कधी लाखोंचा फायदा झाल्याचंही दिसून आलं आहे. त्यामुळे बाजारात घडणाऱ्या घडामोडींचा आणि समोर येणाऱ्या आकड्यांचा अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास करूनच गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३०० टक्क्यांची वाढ!

गेल्या काही काळात मोठा फायदा दर्शवणारी अशीच एक कंपनी म्हणजे सिग्नेचर ग्लोबल. दिल्ली-एनसीआरमधील या रीअल इस्टेट कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर २०२३ मध्ये शेअर मार्केटमध्ये शेअर्स लिस्टिंग झाल्यापासून दरांमध्ये तब्बल ३०० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. सुरुवातीला ३८५ रुपयांमध्ये या शेअर्सची विक्री झाली होती. आता ८ जुलैच्या आकडेवारीनुसार त्याच शेअर्सची किंमत तब्बल १५५९.१५ च्या घरात पोहोचली आहे. २७ सप्टेंबर २०२३ म्हणजे अवघ्या १० महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर बाजारात लिस्टिंग झाले होते.

विक्रीपूर्व उत्पन्नही २५५ टक्क्यांनी वाढलं!

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ३,१२० कोटी रुपयांचे विक्रीपूर्व उत्पन्न मिळवले असून ते गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या उत्पन्नापेक्षा २५५ टक्के जास्त आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात १० हजार कोटी रुपयांच्या विक्रीचे लक्ष्य असून त्यातील ३० टक्क्यांपेक्षा जास्त पहिल्या तिमाहीत गाठले आहे.

बाजार रंग : साप, शिडी आणि सरशी

निव्वळ कर्जामध्ये मोठी घट

एकीकडे सिग्नेचर ग्लोबलच्या उत्पन्नामध्ये चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये १०२ टक्क्यांची वाढ होऊन ते १२१० कोटींपर्यंत गेलं आहे. त्याचवेळी कंपनीवर असणारं निव्वळ कर्ज १६ टक्क्यांनी घटून ९८० कोटींपर्यंत खाली आलं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी हाच आकडा ११६० कोटींच्या घरात होता.

“सिग्नेचर ग्लोबलनं सलग तीन तिमाहींमध्ये सातत्यापूर्ण कामगिरी करत चांगली आर्थिक वृद्धी दर्शवली आहे. त्यात विक्रीपूर्व उत्पन्नाप्रमाणेच प्रत्यक्ष शेअर विक्रीतील नफ्याचाही समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात आम्ही १० हजार कोटींच्या विक्रीपूर्व उत्पन्नाचं लक्ष्य ठेवलं आहे. विशेष म्हणजे या वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत आम्ही त्यातलं ३० टक्के लक्ष्य साध्य केलं आहे”, अशी प्रतिक्रिया सिग्नेचर ग्लोबलचे संचालक प्रदीप कुमार अगरवाल यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Signature global real estate firm share performance in market pmw
Show comments