माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने नोकरभरती करणाऱ्या कंपन्यांसाठी अनुकूल भूमिका घेण्याऱ्या सहा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या पद्धतीतील या गैरव्यवहाराप्रकरणी दोषी आढळल्यानंतर टीसीएसने ही कारवाई केली आहे, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी गुरुवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीसीएसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रशेखरन म्हणाले, कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीबाबत काही संस्थांसाठी आर्थिक लाभासाठी अनुकूल भूमिका घेतल्याने आणखी तीन कर्मचाऱ्यांची सध्या चौकशी सुरू आहे. संबंधित सहा दोषी कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि सहा कंपन्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. मार्च महिन्यात कंपनीला जागल्याकडून प्राप्त झालेल्या दोन तक्रारीनंतर, कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीशी संबंधित आरोपांची चौकशी सुरू केली गेली. कंपनीमध्ये पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी निवड प्रक्रिया आणखी कडक केली जाईल, असेही चंद्रशेखरन म्हणाले.

हेही वाचा: मासिक दीड लाख कोटींचा टप्पा नित्याचा बनेल; जीएसटी संकलनाबाबत केंद्राचा आशावाद

किती घबाड कमावले सांगणे अवघड – चंद्रशेखरन

निलंबित केले गेलेले कर्मचाऱ्यांचा काही नोकरभरती क्षेत्रातील कंपन्यांबाबत पक्षपात उघडकीस आला असला तरी निर्धारित आचारसंहितेचा भंग करून झालेल्या या गैरव्यवहारातून किती घबाड कमावले गेले, याचे मोजमाप करणे आणि ते सांगता येणे अवघड असल्याचे टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले. चालू महिन्याच्या सुरुवातीला या घोटाळ्यातून टीसीएसच्या काही कर्मचाऱ्यांनी १०० कोटी रुपये कमावल्याचे धक्कादायक वृत्त प्रसिद्ध झाले होते. या आकड्याला दुजोरा देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: ‘बजाज’कडून दोन नवीन म्युच्युअल फंड योजना दाखल, ‘असा’ मिळवा फायदा

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six employees sacked from tcs in recruitment malpractice case vrd