एलआयसीने महिलांना डोळ्यासमोर ठेवून ही विशेष विमा पॉलिसी सुरू केली आहे. या पॉलिसीचे नाव LIC आधार शिला पॉलिसी आहे. ८ ते ५५ वर्षे वयोगटातील सर्व महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. तुम्हालाही तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. आम्ही तुम्हाला या पॉलिसीबद्दल तपशीलवार सांगणार आहोत. LIC देशातील प्रत्येक वर्गातील लोकांसाठी पॉलिसी आणत असते. अनेकदा महिला विमा पॉलिसी खरेदी करण्यात खूप मागे असतात. अशा परिस्थितीत एलआयसीने महिलांना डोळ्यांसमोर ठेवून खास विमा पॉलिसी सुरू केली आहे. या पॉलिसीमध्ये महिलांना अनेक प्रकारे फायदे मिळतात. या पॉलिसीमध्ये कोणतीही महिला किमान ७५ हजार रुपये आणि कमाल ३ लाख रुपयांचा विमा खरेदी करू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधार शिला पॉलिसी म्हणजे काय?

तुम्हाला LIC ची आधार शिला पॉलिसी खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधारशिला पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड, सहभागी, वैयक्तिक बचत जीवन विमा पॉलिसी आहे. ही एक दीर्घकालीन बचत योजना आहे, ज्यामध्ये ८ वर्षे ते ५५ वर्षे वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. एलआयसीच्या या योजनेअंतर्गत तुम्हाला तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर गुंतवणूक करता येते. या योजनेअंतर्गत तुम्ही किमान १० वर्षे आणि जास्तीत जास्त २० वर्षे गुंतवणूक करू शकता.

हेही वाचाः व्यापाऱ्यांनो लक्ष द्या! १ मेपासून बदलणार GST चे नियम, ७ दिवसांच्या आत बिल अपलोड करावे लागेल, अन्यथा…

८ लाखांचा लाभ कसा मिळणार?

जर तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी ही योजना सुरू केली आणि दररोज ५८ रुपयांची बचत करून तुम्ही एका वर्षात LIC आधार शिला योजनेत २१,९१८ रुपये जमा कराल. तुम्ही २० वर्षांमध्ये ४,२९,३९२ रुपये गुंतवाल तर मॅच्युरिटीवर तुम्हाला ७,९४,००० रुपयांचा परतावा मिळेल. LIC ची आधारशिला योजना सुरक्षा आणि बचत दोन्ही प्रदान करते. ज्यांचे आधार कार्ड बनले आहे, केवळ त्या महिलाच याचा लाभ घेऊ शकतात.

हेही वाचाः ३० जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास तुमचे किती नुकसान? जाणून घ्या

आधार शिला पॉलिसीचा तपशील

या पॉलिसीमध्ये महिलांना नॉन-लिंक्ड, सहभागी, वैयक्तिक बचत जीवन विमा योजनेतून ३ लाख रुपयांपर्यंतचा सम एश्योर्डबरोबरच ७५,००० रुपयांची विमा रक्कम मिळते. यासोबतच या योजनेच्या मॅच्युरिटीचे कमाल वय ७० वर्षे आहे. एलआयसीची ही योजना पॉलिसीधारक आणि त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत करते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small savings every month and returns of 8 lakhs on maturity lic aadhaar shila policy is special vrd
Show comments