मुंबई : भांडवली बाजाराने मावळत असलेल्या २०२३ सालात गुंतवणूकदारांच्या पदरी २० टक्क्यांचा भरीव परतावा दिला. शिवाय गुंतवणूकदारांसाठी हे सलग आठवे वर्ष लाभाचे ठरले. मात्र वर्षातील अखेरच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरणीसह बंद झाले.

सप्ताहातील तीव्र तेजीनंतर गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले आणि सलग पाच सत्रांतील तेजीला खंड पडण्यासह, वर्षसांगतेच्या सत्रात दोन्ही प्रमुख निर्देशांक नकारात्मक क्षेत्रात राहिले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १७०.२० अंशांनी घसरून ७२,२४०.२६ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ३२७.७४ अंश गमावत ७२,०८२.६४ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४७.३० अंशांची घसरण झाली आणि तो २१,७३१.४० पातळीवर स्थिरावला.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट

हेही वाचा >>> प्रमुख पायाभूत क्षेत्रांची वाढ खुंटली! नोव्हेंबरमध्ये ७.८ टक्क्यांच्या सहा महिन्यांतील नीचांकाला

शुक्रवारच्या सत्रात ऊर्जा, बँकिंग आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला, ज्यामुळे निर्देशांकात घसरण झाली. व्यवहार झालेल्या वर्षाच्या या शेवटच्या दिवशी बाजारात सौम्य स्वरूपाच्या नफावसुली गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिले. तथापि अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेसह जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून संभाव्य व्याजदर कपात आणि अमेरिकी रोख्यांवरील परतावा घटल्याने आगामी वर्षात बाजारात उत्साह कायम राहण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, खनिज तेलाच्या किमती वर्षभरात १० टक्क्यांनी घसरल्या, ज्यामुळे महागाईचा दबाव कमी होऊ शकतो आणि ते कंपन्यांच्या चांगल्या कार्यप्रदर्शनासाठी उपयुक्त ठरू शकते.

अल्प ते मध्यम कालावधीत निर्देशांकांसंबंधी दृष्टिकोन वाजवी स्वरूपाच असला तरी, मजबूत कमाईच्या अपेक्षेने लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये तेजीचा जोम दिसून येईल, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. सेन्सेक्समध्ये स्टेट बँक, इन्फोसिस, टायटन, टेक महिंद्र, इंडसइंड बँक, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि कोटक महिंद्र बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. दुसरीकडे, टाटा मोटर्स, नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग तेजीसह बंद झाले.

हेही वाचा >>> सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांना नववर्षाची भेट; वार्षिक व्याजदरात ०.२० टक्के वाढ

आगेकूच आठव्या वर्षात

गत २० वर्षांत, २००२ पासून सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी २००८, २०११ आणि २०१५ मध्ये असे फक्त तीनदा वार्षिक घसरण अनुभवली आहे. दोन दशकांच्या कालावधीत अन्य प्रत्येक वर्षात प्रमुख निर्देशांकांची मोठ्या कमाईसह आगेकूच सुरू राहिली आहे. २०२३ देखील निर्देशांकांत वार्षिक भर घालणारे सलग आठवे वर्ष राहिले. सेन्सेक्स आणि निफ्टी या वर्षभरात अनुक्रमे १८ टक्के आणि १९.६ टक्क्यांनी वाढले. तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकात अनुक्रमे ४३ टक्के आणि ४६ टक्क्यांची मोठी झेप या वर्षाने अनुभवली.

गुंतवणूकदार ८१.९० लाख कोटींनी श्रीमंत

सरत्या २०२३ या वर्षाने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल ८१.९० लाख कोटी रुपयांची भर घातली. किरकोळ गुंतवणूकदारांच्या मोठ्या सहभागाने २०२३ मध्ये शेअर बाजारातील तेजीला चालना देण्यात प्रमुख भूमिका बजावली. वर्ष २०२३ मध्ये सेन्सेक्सने ११,३९९.५२ अंशांची म्हणजेच १८.७३ टक्क्यांनी उसळी मारली. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल यावर्षी ८१,९०,५९८ कोटी रुपयांनी वाढून ३६४.२८ लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च उच्चांकावर पोहोचले आहे.

टाटा मोटर्स २०२३ चा ‘हिरो’

वर्षभरात टाटा मोटर्सचा समभाग १०२ टक्क्यांनी वधारला. २०२३ वर्षातील अखेरच्या व्यवहार सत्रात टाटा मोटर्सच्या समभागाने ८०२.९० रुपयांची ५२ आठवड्यातील सर्वोच्च पातळी गाठली. दिवसअखेर तो ३.४६ टक्क्यांनी वधारून ७७९.९५ रुपयांवर बंद झाला. निफ्टीमधील आघाडीच्या ५० कंपन्यांमध्ये एकमेव टाटा मोटर्सचा समभाग वर्षभरात दुपटीहून अधिक वधारला आहे. गेल्या वर्षी ३० डिसेंबर २०२२ रोजी टाटा मोटर्सचा समभाग ३८७.९ रुपयांवर बंद झाला होता.

Story img Loader