इंडियन मेडिकल असोसिएशन आणि रामदेव बाबा यांची पतंजली आता एकमेकांसमोर येऊन उभे ठाकले आहेत. एक दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाने रामदेव यांच्या पतंजतीला दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर फटकारले होते. त्यानंतर बुधवारी पत्रकार परिषदेत रामदेव बाबा म्हणाले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो. खोट्या जाहिराती किंवा अपप्रचार केल्यास आम्हाला कोट्यवधी रुपयांचा दंड आणि फाशीची शिक्षा द्यावी. आक्षेप घेतला जाणार नाही. आम्ही खोटा प्रचार करत नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले. पत्रकारांना संबोधित करताना ते म्हणाले की, काही लोक पतंजलीविरोधात खोटा प्रचार करीत आहेत. अॅलोपॅथी आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचे पुरस्कर्ते खोटेपणाचा प्रचार करत आहेत. न्यायालयासमोर शेकडो रुग्ण उभे करू शकतो. आम्ही ते सर्व रिपोर्ट आणि संशोधन न्यायालयात दाखवण्यास तयार आहोत, ज्याबद्दल आम्ही नेहमी सांगत आलो आहोत, असंही रामदेव बाबा म्हणालेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा