Highest Average Salary In India : देशातील सर्वाधिक पगाराचे पॅकेज देण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील सोलापूर शहर हे दिल्ली, मुंबई, बंगळुरू या शहरांना मागे टाकून पहिल्या क्रमांकाचे शहर बनले आहे. या जुलै २०२३ च्या सरासरी वेतन सर्वेक्षणा (Average Salary Survey)नुसार, दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू आणि हैदराबाद यांसारख्या शहरांना मागे टाकत महाराष्ट्रातील सोलापूर शहरामध्ये देशातील सर्वाधिक सरासरी वार्षिक वेतन पॅकेज मिळत आहे. महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये वार्षिक सरासरी पगार २८,१०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच २१.१७ लाख रुपयांच्या सरासरी वार्षिक पगारासह मुंबई शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. २१.०१ लाख रुपयांच्या सरासरी पगारासह बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली आपल्या चौथ्या क्रमांकावर स्थिर आहे, दिल्लीतील व्यक्तीचा सरासरी वार्षिक पगार २०.४३ लाख रुपये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याच्या बाबतीत यूपीचा क्रमांक पहिला

राज्याचा विचार केल्यास उत्तर प्रदेश सर्वाधिक सरासरी वार्षिक पगारासह आघाडीवर आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल आहे. याशिवाय जुलै २०२३ मध्ये जाहीर झालेल्या सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, भारतातील सर्वात सामान्य वार्षिक पगार ५ लाख रुपयांपेक्षा थोडा जास्त आहे, तर संपूर्ण देशाची सरासरी काढली असता वार्षिक पगार सुमारे १८.९१ लाख रुपये आहे.

हेही वाचाः अदाणी समूहाने ‘या’ तीन कंपन्यांमधील भागीदारी विकली, जमवले ११,३३० कोटी रुपये

महिला आणि पुरुषांच्या पगारातही तफावत

महिला आणि पुरुषांच्या पगारात बरीच तफावत असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. उदाहरणार्थ, पुरुषांना सरासरी १९,५३,०५५ रुपये पगार मिळतो, तर महिलांना सरासरी १५,१६,२९६ रुपये पगार मिळतो. भारतातील सर्वात जास्त पगार देणारी क्षेत्रे ही व्यवस्थापन आणि व्यावसायिक उद्योगांशी निगडीत आहेत, जेथे वार्षिक सरासरी पगार २९.५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. दुसरा सर्वात जास्त पगार देणारे क्षेत्र म्हणजे कायदा आहे, जिथे वार्षिक सरासरी पगार सुमारे २७ लाख रुपये आहे.

हेही वाचाः Money Mantra : ‘या’ ५ म्युच्युअल फंडांनी बाजारात ३० वर्षे केली पूर्ण, परताव्याच्या बाबतीत बनले बादशाह, वाढवली गुंतवणूकदारांची संपत्ती

सर्वाधिक सरासरी पगार असलेली भारतातील ८ महत्त्वाची शहरे

सोलापूर: २८,१०,०९२ रुपये
मुंबई: २१,१७,८७० रुपये
बंगळुरू: २१,०१,३८८ रुपये
दिल्ली: २०,४३,७०३ रुपये
भुवनेश्वर: १९,९४,२५९ रुपये
जोधपूर: १९,४४,८१४ रुपये
पुणे: १८,९५,३७० रुपये
हैदराबाद: १८,६२,४०७ रुपये

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur city in maharashtra has surpassed delhi mumbai and bangalore in offering the highest salary package vrd
Show comments