सार्वजनिक सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी आणि नागरिकांना अखंड सहाय्य प्रदान करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) १९४७ क्रमांकाची ‘टोल-फ्री हेल्पलाइन’ म्हणजेच दूरध्‍वनीमार्फत मोफत मदतसेवा सुरू केली आहे. आधारशी संबंधित समस्या, प्रश्न आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ही हेल्पलाइन चोवीस तास सुरू राहणार आहे.  त्यामुळे नागरिकांना त्वरित सहाय्य मिळविण्यासाठी सोयीची ठरणार आहे.

ही परिचलन स्वयं सहाय्य सेवा आठवड्याचे सर्व दिवस चोवीस तास स्वयं सहाय्य पद्धतीने (सेल्फ सर्व्हिस) उपलब्ध आहे. टोल फ्री हेल्पलाइन १९४७ ही नागरिकांचे आधारशी संबंधित विविध प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जन्मतारीख, नाव, मोबाईल क्रमांक किंवा पत्ता यासारखे वैयक्तिक तपशील अद्ययावत करणे असो, की पीव्हीसी कार्डबद्दल माहिती शोधणे असो, ही हेल्पलाईन, आधारबाबतच्या कोणत्याही चौकशीसाठी सर्वसमावेशक उपाय आहे. त्याशिवाय या हेल्पलाईनच्या मदतीने नागरिकांना त्यांच्या EID/UID ची सद्यःस्थिती तपासता येईल, घर नोंदणी सेवांसाठी सहाय्य मिळेल आणि अद्ययावतीकरणाची विनंती फेटाळली गेली, तर त्यामागचे कारण समजू शकेल.

Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
CM Devendra Fadnavis and Pankaj Bhoyar will visit Datta Meghes residence in Khamla
असा गुरु, असा शिष्य! मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथम भेट सावंगीत…
Delay in recommendation from Group of Ministers in GST Council meeting regarding insurance premiums
विमा हप्त्यांवर दिलासा नाही, जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंत्रिगटाकडून शिफारशीत दिरंगाई; अन्य मुद्द्यांवर विचारविनिम
Mora port, Signature campaign, Mora port news,
मोरा बंदरातील गाळ काढण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम
Solapur Mathadi kamgar protest, Mathadi kamgar,
सोलापुरात माथाडींच्या आंदोलनामुळे ५० हजार क्विंटल कांदा वाहनांमध्ये पडून
Hospital Thane, Thane Arogya Vardhini Center,
ठाण्यात आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्यासाठी जागा मिळेना
No permission required to cut tree branches Various bills introduced in the Legislative Assembly
झाडाच्या फांद्या तोडण्यास परवानगीची गरज नाही; विधानसभेत विविध विधेयके सादर

हेही वाचाः राज्यात १६ ठिकाणी नाफेडची कांदा खरेदी केंद्र सुरू करणार, गोयल यांचं भुजबळांना आश्वासन

या सेवेचा वापर करण्यासाठी, नागरिक त्यांच्या लँडलाइन किंवा मोबाईल फोनवरून १९४७ क्रमांक डायल करू शकतात. ही हेल्पलाईन १२ भाषांमधील संवादासाठी सक्षम असून, सहाय्य मिळवण्यासाठी भाषेचा अडथळा ठरणार नाही, हे सुनिश्चित करते. वापरकर्त्यांकडे स्वयंचलित IVRS प्रणाली द्वारे मार्गदर्शन मिळवण्याचा किंवा वैयक्तिक सहाय्य मिळवण्यासाठी आधार केअर एक्झिक्युटिव्हशी थेट संपर्क साधण्याचा पर्याय उपलब्ध असेल.  

हेही वाचाः नगरनार स्टील प्लांटने प्रथमच हॉट रोल्ड कॉइल निर्मिती करून रचला इतिहास

अद्ययावतीकरणाची विनंती नाकारली गेली, तर १९४७ क्रमांकार कॉल करून नकाराचे कारण जाणून घेता येईल आणि पुन्हा विनंती करण्यापूर्वी आवश्यक ती सुधारणा करण्याचा मार्ग उपलब्ध राहील. कॉल केल्यावर नागरिकांना एसएमएसद्वारे संवाद क्रमांक त्वरित जारी केला जातो, ज्याच्या सहाय्याने ते आपल्या तक्रार निवारणाबाबतच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकतील. याशिवाय, आधार कार्ड एक्झिक्युटिव्हबरोबर हा संवाद क्रमांक सामायिक करून तक्रारीची सद्यःस्थिती तपासता येईल. ज्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संवाद करायचा आहे, त्यांना आपले प्रश्न, अभिप्राय, सूचना आणि तक्रारी देखील पुढील ईमेलवर पाठवता येतील. help@uidai.gov.in. त्याशिवाय पुढील अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दखल करता येईल.

Story img Loader