लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
पुणे : टाइल्स आणि बाथवेअर क्षेत्रातील ‘सोमाणी सिरॅमिक लिमिटेड’ने राज्यातील छोट्या शहरांमध्ये विस्ताराचे पाऊल उचलले आहे. या छोट्या शहरांतील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. याचवेळी पुण्यासारख्या महानगरात ‘सोमाणी एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू करून ग्राहकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती ‘सोमाणी सिरॅमिक्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सोमाणी यांनी दिली.
‘सोमाणी सिरॅमिक्स लिमिटेड’ने पुण्यात नवीन ‘सोमाणी एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू केले असून, त्याच्या उद्धाटनावेळी अभिषेक सोमाणी बोलत होते. ते म्हणाले की, आमच्या कंपनीचा २५ टक्के व्यवसाय हा पश्चिम भारतातून येतो. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांत विस्तार करण्यावर भर देण्यात येत आहे. प्रामुख्याने छोट्या शहरांपर्यंत पोहोचण्याचा आणचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर महानगरांतील ग्राहकांसाठी कंपनीने वेगळे पाऊल उचलले आहे. आम्ही आधी मुंबईत ‘सोमाणी एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू केले होते. त्या माध्यमातून ग्राहकांना वेगळा अनुभव देण्याचा आमचा उद्देश होता. आता पुण्यातही हे केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रात वॉल आणि फ्लोअर टाइल्स, सॅनिटरी वेअर आणि बाथ फिटिंग्सची विस्तृत उत्पादने अनुभवण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहेत.