Israel Hamas War : इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील वाढत्या संघर्षादरम्यान भारतीय आयटी कंपन्या इस्रायलमध्ये तैनात असलेल्या त्यांच्या कर्मचार्‍यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. लाइव्ह मिंटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही देशातील सर्वात मोठी आयटी कंपनीदेखील सध्या इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धावर लक्ष ठेवून आहे. तसेच तिथल्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आहे. याशिवाय कंपनी इस्रायलमध्ये तैनात असलेल्या TCS कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीसीएस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली माहिती

मिंटच्या बातमीनुसार, कंपनीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. एका TCS अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कंपनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि तेथील मानव संसाधन अधिकार्‍यांच्या संपर्कात आहे आणि कर्मचार्‍यांना त्यांच्या सुरक्षेबाबत सर्व सहकार्य करीत आहे. तेथे काही कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयही आहेत. याशिवाय अधिकाऱ्याने तेथे काम करणाऱ्या आणि भारतातील टीसीएस कर्मचाऱ्यांची संख्या उघड केलेली नाही.

हेही वाचाः अदाणी समूहावर आता फायनान्शिअल टाइम्सनेही केले गंभीर आरोप; गौतम अदाणी म्हणाले, ”वैयक्तिक स्वार्थासाठी समूहाचे…”

शनिवारपासून युद्ध सुरू

इस्रायल आणि पॅलेस्टाइन समर्थक हमास या दहशतवादी संघटना यांच्यात शनिवारपासून युद्ध सुरू आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या लोकांची संख्या ७०० हून अधिक झाली आहे, तर पॅलेस्टाइनमध्येही ४०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात ९ अमेरिकन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकन अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे.

हेही वाचाः एलॉन मस्कच्या संपत्तीबरोबरच मुकेश अंबानींची संपत्ती वाढली, जाणून घ्या जगातील टॉप १० अब्जाधीश कोण?

इतर आयटी कंपन्यांची काय स्थिती?

विप्रो आणि इन्फोसिसनेही अशा प्रश्नांना उत्तर दिलेले नाही. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे इतर आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या सुरक्षेबाबतही भीती व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some tcs employees stranded in israel company closely monitors employee safety vrd
Show comments