लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी बेंगळुरु : प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) लवकरच भांडवली बाजारात प्रवेश नियोजित असलेल्या ओला इलेक्ट्रिकचे पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून स्व-निर्मित लिथियम-आयन बॅटरी संचासह ई-स्कूटर्स बाजारात आणण्याचे लक्ष्य आहे. या आयात-पर्यायी स्वनिर्मित बॅटरी संचामुळे दुचाकीच्या उत्पादन खर्चात तब्बल ३५ ते ४० टक्क्यांची बचत होऊन, भारतात अधिक किफायतशीर ई-वाहने उपलब्ध होऊ शकतील.

स्वदेशी विकसित बॅटरी सेल कंपनीच्या सध्या बांधकाम सुरू असलेल्या कृष्णगिरी, तमिळनाडूस्थित ओला गिगाफॅक्टरीमध्ये तयार केले जातील. ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि ईव्ही उत्पादन खर्चही कमी होईल. या प्रकल्पाच्या ५ गिगावॅट प्रति तास क्षमतेच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ८३५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहिती ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अगरवाल यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ‘पुढील वर्षाच्या सुरुवातीस आमच्या स्कूटरमध्ये स्वतःचे सेल असतील. ज्यातून आम्ही आमच्या ईव्हीची किंमतदेखील कमी करू शकतो,’ असे ते म्हणाले. ५ गिगावॅट स्थापित क्षमतेतून दरसाल १५ लाख दुचाकींची गरज पूर्ण केली जाईल, म्हणजेच ओला इलेक्ट्रिकद्वारे निर्मित दुचाकींमध्ये १०० टक्के स्व-निर्मित बॅटरी वापरल्या जातील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Ajit Pawar, sugar factory, Amit Shah allegation,
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा, अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या

हेही वाचा – ‘एआयबीईए’च्या माध्यमातून बँक ग्राहकांसाठी विनामूल्य ‘बँक क्लिनिक’ सेवा

बाजार नियामक ‘सेबी’ने ओला इलेक्ट्रिकच्या प्रस्तावित आयपीओला नुकताच हिरवा कंदील दिला आहे. कंपनीकडून सेबीकडे दाखल मसुदा प्रस्तावानुसार, ओला गिगाफॅक्टरीची क्षमता आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेरीस ५ गिगावॉटवरून ६.४ गिगावॉटपर्यंत वाढवण्यासाठी ‘आयपीओ’द्वारे उभारल्या जाणाऱ्या निधीपैकी १,२२६ कोटी रुपये वापरण्याचे नियोजन कंपनीने मांडले आहे. क्षमतेत वाढीनंतर, त्रयस्थ ई-दुचाकी निर्मात्या आणि अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना ओला बॅटरींचा पुरवठा केला जाईल, असे भाविश अगरवाल म्हणाले. सध्या ओला ई-स्कूटरमध्ये वापरात येणाऱ्या २१-७० धाटणीच्या सेलपेक्षा पाच पटीने अधिक ऊर्जा क्षमता असणाऱ्या ४८-८० धाटणीच्या प्रगत सेलच्या वापरासाठी कंपनी प्रयत्नशील असून, पुढील सहा महिन्यांत चाचण्या-प्रयोग पूर्ण केल्यानंतर त्यांचे वाणिज्यिक उत्पादन सुरू होऊ शकेल. त्यापुढे जाऊन सॉलिड स्टेट बॅटरीच्या वापराच्या दिशेने कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यासंबंधाने आताच काही भाष्य करणे घाईचे ठरेल, असे अगरवाल यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – गणेश ग्रीन भारतची शुक्रवारपासून प्रत्येकी १८१ ते १९० रुपयांनी भागविक्री

पूर्णपणे महिला कामगारांकडून निर्मिती

ओला फ्युचरफॅक्टरी नावाच्या ई-स्कूटर निर्मिती प्रकल्पाच्या असेंब्ली लाइनवर केवळ महिला कामगारांनाच वापराच्या धोरणाची पुनरावृत्ती नवीन बॅटरी सेल निर्मितीच्या गिगाफॅक्टरीतही केली जाईल. सध्या फ्युचरफॅक्टरीमध्ये तीन पाळ्यांमध्ये जवळपास ४,००० महिला कामगार कार्यरत आहेत. ‘महिला कर्मचाऱ्यांबाबत आमचा अनुभव खूपच चांगला राहिला आहे. त्या वक्तशीर असण्यासह, अधिक शिस्तीने काम करत असल्याने आगामी प्रकल्पांबाबतही हेच पूर्णपणे स्त्री-केंद्रित धोरण कायम राहील,’ असे भाविश अगरवाल यांनी स्पष्ट केले. आयफोनची असेंब्ली करणाऱ्या तमिळनाडूतील प्रकल्पात विवाहित महिलांना घेण्यास नकार देणाऱ्या फॉक्सकॉनच्या ताज्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर ओला इलेक्ट्रिकचे हे धोरण विशेष लक्षणीय ठरते.