Sovereign Gold Bond Scheme 2023-24 Issue Dates (June and September) 2023 : तुम्हालाही सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात गुंतवणुकीसाठी सोन्याची सर्वाधिक निवड केली जाते. प्रत्येक वर्ग त्यात कुठे ना कुठे गुंतवणूक करतो. बरेच लोक सोन्यात फक्त फिजिकल पद्धतीने गुंतवणूक करतात. तर बरेच लोक फिजिकल आणि ऑनलाइन दोन्ही मोडमध्ये गुंतवणूक करतात. जर तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला एफडी किंवा इतर गुंतवणुकीसारख्या व्याजाचा लाभही मिळेल.
गुंतवणूक कशी करावी?
फिजिकल सोने ही एक सार्वभौम सुवर्ण रोखे (Sovereign Gold Bond) योजना आहे. २०२३-२४ या वर्षासाठी सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेची पहिली मालिका १९ जून २०२३ रोजी उघडेल. या योजनेत तुम्ही २३ जूनपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या योजनेत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करू शकता. तुम्ही ऑनलाइन गुंतवणूक केल्यास तुम्हाला ५०% सूट मिळेल. सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेत तुम्हाला दरवर्षी २.५० टक्के व्याज दिले जाते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाँडवर कर्जही घेऊ शकता. या बाँडची किंमत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड (IBJA) ने निश्चित केली आहे. IBJA प्रकाशित दराच्या आधारे बाँडची किंमत सेट केली जाते. सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेची दुसरी मालिका ११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२३ दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मार्फत उघडली जाणार आहे. त्याची जारी तारीख २० सप्टेंबर २०२३ असेल.
किती ग्रॅम सोने खरेदी करू शकता?
किमान गुंतवणूक एक ग्रॅम सोने आहे. सदस्यत्वाची कमाल मर्यादा व्यक्तींसाठी ४ किलो आणि ट्रस्ट आणि तत्सम संस्थांसाठी २० किलो आहे, प्रति आर्थिक वर्षात (एप्रिल-मार्च) सरकारने वेळोवेळी अधिसूचित केले आहे. RBI च्या मते, गुंतवणूकदारांना सबस्क्रिप्शनसाठी अर्ज करताना सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागते. “वार्षिक कमाल मर्यादेमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांतर्गत सदस्यता घेतलेल्या सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना घेतलेले आणि आर्थिक वर्षात दुय्यम बाजारातून खरेदी केलेल्यांचा समावेश असेल,” RBI ने सांगितले.
“ही योजना किरकोळ गुंतवणूकदारांना सोन्यामध्ये सुरक्षितता प्रधान करते, तसेच व्याज देणारी गुंतवणूक मिळते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणता येते आणि या मौल्यवान धातूच्या दीर्घकालीन संभाव्यतेचा फायदा होतो. सुलभ प्रवेश, शुद्धता हमी, व्याजाची कमाई आणि कर लाभांसह सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सोन्याच्या संभाव्यतेचा उपयोग करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक संधी आहे,” असंही गोल्डनपीचे सीईओ अभिजित रॉय म्हणतात.
यूएस फेड रिझर्व्हचा निर्णय
यूएस फेड रिझर्व्हने चलनविषयक धोरणाचा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम सोने-चांदीवर होताना दिसत आहे. काल सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. IBJA च्या वेबसाइटनुसार, २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,०२० रुपये झाली आहे. यामध्ये २४४ रुपयांची घसरण झाली आहे. तसेच २२ कॅरेट सोन्याचा भाव आता ५४,०६२ रुपयांवर गेला आहे. चांदीच्या दरातही ६८४ रुपयांची घसरण दिसून आली आहे. आता चांदीचा भाव ७१,४२१ रुपयांवर गेला आहे. अमेरिकेने यावेळी आपल्या पतधोरणात व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.