पीटीआय, नवी दिल्ली

भारताच्या विकासदराचा अंदाज पुढील दोन आर्थिक वर्षांसाठी जागतिक पतमानांकन संस्था ‘एस ॲण्ड पी’ने घटविला आहे. उच्च व्याजाचे दर आणि बिघडलेल्या वित्तीय संतुलनामुळे घटलेल्या शहरी क्रयशक्तीचा विकास दराला फटका बसण्याची शक्यता आहे.

p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
moody forecasts indian economy
मूडीजला ७.२ टक्के अर्थवेगाचा विश्वास
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
india s industrial production rises 3 1 percent in september
कारखानदारी क्षेत्राचे ऑगस्टमधील उणे स्थितीतून सकारात्मक वळण , सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन दरात ३.१ टक्क्यांची वाढ

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीनंतर आशिया-प्रशांत विभागातील अर्थव्यवस्थांचा ‘एस ॲण्ड पी’ने सुधारित अंदाज वर्तविला आहे. भारताच्या विकासदराचा अंदाज आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ६.७ टक्के आणि २०२६-२७ मध्ये ६.८ टक्के राहील, असे संस्थेने म्हटले आहे. याआधी पुढील आर्थिक वर्षासाठी ६.९ टक्के आणि त्यापुढील वर्षासाठी ७ टक्के अंदाज वर्तविण्यात आला होता, जो सुधारित अंदाजात प्रत्येकी ०.२ टक्क्यांनी घटला आहे. चालू आर्थिक वर्षातील विकासदरासाठी तिने ६.८ टक्क्यांचा अंदाज वर्तविला आहे.

हेही वाचा >>>‘सिल्व्हर ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरअखेर मालमत्ता १२,३३१ कोटींवर; परताव्यात ‘गोल्ड ईटीएफ’ला मात

‘एस ॲण्ड पी’ने म्हटले आहे की, चालू आर्थिक उच्च व्याजाचे दर आणि बिघडलेल्या वित्तीय संतुलनामुळे शहरी भागांतून ग्राहक मागणी आणि क्रयशक्तीला फटका बसत आहे. यामुळे भारताचा विकास दर चालू आर्थिक वर्षात ६.८ टक्क्यांवर राहील. खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा पीएमआय निर्देशांक विस्तारत असला तरी वाढीची गती मंदावल्याचे अन्य निदर्शक दर्शवीत आहेत. याचा फटका सप्टेंबर तिमाहीत बांधकाम क्षेत्राला बसला. आर्थिक वर्ष २०२७-२८ मध्ये मात्र भारताचा विकास दर ७ टक्के राहील.

हेही वाचा >>>Stock Market Update :‘सेन्सेक्स’ची १९६१ अंशांची जोरदार मुसंडी

चीनसाठी कसोटीचा काळ

अमेरिकी सरकारकडून आगामी काळात अनुसरले जाणारे आक्रमक धोरण हे चीनसह आशिया-प्रशांत विभागासाठी आव्हानात्मक ठरेल. चिनी वस्तूंवरील कर अमेरिकेकडून वाढविला जाण्याची शक्यता आहे. यामुळे ‘एस ॲण्ड पी’ने चीनच्या विकास दराचा अंदाज चालू वर्षासाठी ४.८ टक्क्यांवर कायम ठेवला असून, पुढील वर्षासाठी तो ४.३ टक्क्यांवरून ४.१ टक्क्यांवर आणला आहे.