75 Rupees Coin Launch on New Parliament Building Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. यादरम्यान ७५ रुपयांचे नाणे बाजारात आणले जाणार आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ ७५ रुपयांचे विशेष नाणे लॉन्च केले जाणार असल्याची वित्त मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ७५ रुपयांच्या या नाण्याच्या डिझाईनपासून ते त्याचा आकार आणि छपाईपर्यंत अनेक वैशिष्ट्ये असतील. नवीन संसद भवनाची रचना त्रिकोणी आहे. अशा स्थितीत या नाण्याचे स्वरूपही नव्या संसद भवनासारखे असण्याची शक्यता आहे.
७५ रुपयांचे नाणे कसे असेल?
संसद भवनाच्या लॉन्चिंगवेळी जारी करण्यात येणारे ७५ रुपयांचे नाणे ३५ ग्रॅमचे असेल. त्यात ५० टक्के चांदी आणि ४० टक्के तांबे असेल. याव्यतिरिक्त ५ टक्के झिंक आणि निकेल असेल. दुसरीकडे जर आपल्याला त्याच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभावरील सिंह असेल, ज्याच्या खाली “सत्यमेव जयते” लिहिलेले असेल. डावीकडे देवनागरी लिपीत ‘भारत’ आणि उजवीकडे इंग्रजीत ‘इंडिया’ लिहिलेलं पाहायला मिळेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवनाचे डिझाईन बनवले जाईल आणि त्याच्या वर आणि खाली संसद परिसर असे लिहिलेले असेल. याबरोबरच नाण्याच्या खालच्या बाजूला २०२३ हे वर्ष छापलेले दिसेल.
संसद भवन त्रिकोणी रचनेत बांधलेय
संसदेची नवीन इमारत त्रिकोणी डिझाइनची आहे. त्याच्या लोकसभेत ८८८ जागा आहेत आणि त्याच्या अभ्यागतांच्या गॅलरीत ३३६ पेक्षा जास्त लोक बसू शकतात. याशिवाय संसद भवनात राज्यसभेच्या ३८४ खुर्च्या आहेत. नवीन संसद भवन तांत्रिक सुविधांनी सुसज्ज आहे. त्यात एकापेक्षा एक तांत्रिक सुविधा आहेत.
हेही वाचाः मजुराच्या खात्यात यायचे १७ रुपये, अचानक १०० कोटी आले, मग झालं असं काही…