पीटीआय, नवी दिल्ली

प्रवासी विमान कंपनी स्पाईसजेटने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा कोणताही विचार नसल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. कंपनीच्या ताफ्यातील सुमारे २५ विमाने सध्या उभी असून, ती पुन्हा सेवेत आणण्यासाठी ५ कोटी डॉलरच्या निधीचा वापर केला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गो फर्स्ट एअरलाइन या प्रवासी विमान कंपनीने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी केलेला अर्ज राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) मंजूर केला आहे. गो फर्स्टला विमाने भाड्याने देणाऱ्या काही कंपन्यांनी याला आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर स्पाईसजेटने म्हटले आहे की, कंपनीचा दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा कोणताही विचार नाही. दुसऱ्या कंपनीने ही प्रक्रिया सुरू केल्याने आमच्याबाबत चर्चा सुरू आहे. आमचे व्यवसायावर लक्ष केंद्रित असून, निधी उभारणीसाठी गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू आहे. स्पाईसजेटला विमाने भाड्याने देणाऱ्या एअरकॅसल (आयर्लंड) कंपनीने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी एनसीएलटीकडे ८ मे रोजी अर्ज केला. यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी एनसीएलटीने स्पाईसजेटला नोटीसही बजावली आहे. स्पाईसजेटच्या तीन विमानांची नोंदणी रद्द करावी, अशी मागणीही एअरकॅसलने केली आहे.

हेही वाचा – बदलत्या बँकिंग व्यवस्थेतील धोरण अंमलबजावणीसाठी ‘जनअभियान’

कोटकंपनीने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याबाबतची चर्चा निराधार आहे. सध्या बंद असलेली विमाने पुन्हा सेवेत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकारकडून तातडीच्या कर्ज हमी योजनेंतर्गत ५ कोटी डॉलरचा निधी कंपनीला मिळाला आहे. – अजयसिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, स्पाईसजेट

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spicejet dismisses talk of bankruptcy print eco news ssb