नवी दिल्ली : वाडिया समूहाच्या मालकीची स्वस्त दरातील प्रवासी विमानसेवा ‘गो फर्स्ट’ (पूर्वीची ‘गो एअर’) खरेदी करण्यास स्पाइसजेटने मंगळवारी स्वारस्य दाखविले आहे. परिणामी मंगळवारच्या सत्रात स्पाइसजेटच्या समभागाने ६९.२० रुपये ही ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली.निधीच्या तीव्र चणचणीमुळे सरलेल्या मे महिन्यात उड्डाणे स्थगित करत ‘गो फर्स्ट’ने राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) दिल्लीच्या खंडपीठापुढे स्वेच्छेने दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष इंजिन पुरवठादार प्रॅट अँड व्हिटनी (पी अँड डब्ल्यू) या कंपनीने अपेक्षेप्रमाणे इंजिनचा पुरवठा न केल्यामुळे या विमानसेवेच्या ताफ्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे २८ विमाने जमिनीला खिळलेली आहेत आणि प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले. गो फर्स्टच्या प्रवर्तकांनी गेल्या तीन वर्षांत या विमानसेवेमध्ये ३,२०० कोटी रुपयांचा भरीव निधी ओतल्यानंतरही हे पाऊल उचलणे कंपनीला अपरिहार्य पडले आहे. विमानसेवेला तिच्या ताफ्यातील एअरबस ए३२० निओ विमानांपैकी जवळपास ५० टक्के विमाने ही प्रॅट अँड व्हिटनीच्या इंजिनांतील ‘क्रमिक सदोषते’मुळे उड्डाणासाठी न वापरता जमिनीला खिळून ठेवावी लागली आहेत. इंजिनातील सदोषतेमुळे गमावला गेलेला महसूल आणि अतिरिक्त खर्चामुळे गो फर्स्टला सुमारे १०,८०० कोटी रुपयांनी नुकसान झाले आहे.दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात स्पाइसजेटचा समभाग २.९१ टक्क्यांनी वधारून ६६.०८ रुपयांवर बंद झाला.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spicejet interested in buying bankrupt go first print eco news amy