सध्या वाडिया समूहाची विमान कंपनी गो फर्स्ट आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. NCLT ने त्यांची दिवाळखोरी प्रक्रिया याचिका देखील मंजूर केली आहे. दरम्यान, स्पाइसजेट या खासगी क्षेत्रातील आणखी एका विमान कंपनीने दिवाळखोरीशी संबंधित बातम्यांचे खंडन केले आहे. स्पाइसजेट लिमिटेडचे ​​म्हणणे आहे की, कंपनी दिवाळखोरीत असल्याची याचिका दाखल करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. आम्ही आमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करीत आहोत. निधी उभारण्यासाठी आणि स्वतःला पुन्हा रुळावर आणण्यासाठी एअरलाइन गुंतवणूकदारांशी सतत चर्चा करीत आहे.

SpiceJet ने सरकारच्या इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) मधून एअरलाइनला मिळालेल्या अंतर्गत रोख आणि ५० अब्ज डॉलर निधीसह बंद असलेली विमाने पुन्हा उड्डाण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दिवाळखोरीसाठी दाखल करण्याची योजना एअरलाइनने स्पष्टपणे नाकारली आहे.

central minister nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर माफी, म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Devendra Fadnavis News in Marathi
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “आम्ही निवडणुकीत सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि..”
Sensex falls by 964 points print eco news
‘फेड’सावधतेने विक्रीचा रेटा; ‘सेन्सेक्स’ ९६४ अंशांनी गर्भगळित
Congress state president Nana Patole made serious allegations against state government
हे सरकार राज्य विकल्याशिवाय थांबणार नाही… नाना पटोले म्हणाले…
Devendra Fadnavis EVM, Devendra Fadnavis,
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “होय आमचे सरकार ईव्हीएमचे, कारण…”
Thackeray group MP Arvind Sawant questions whether the Constitution was forgotten while breaking Shiv Sena print politics news
शिवसेना फोडताना संविधानाचा विसर? ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा सवाल
Loksatta editorial PM Narendra Modi Addresses Lok Sabha in Constitution Debate issue
अग्रलेख: प्रहसनी पार्लमेंट

स्पाइसजेटला दिवाळखोरीची नोटीस मिळाली होती

नुकतीच NCLT ने स्पाइसजेटला दिवाळखोरीची नोटीस पाठवली आहे. स्पाइसजेटला ही नोटीस आयर्लंडच्या विमान भाड्याने देणाऱ्या कंपनीच्या याचिकेवर जारी करण्यात आली आहे. एअरक्राफ्ट लीजिंग कंपनी एअरकॅसलने दावा केला आहे की, स्पाइसजेटकडे त्यांची थकबाकी आहे. याचिकेत एनसीएलटीला स्पाइसजेटच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर दिवाळखोरीसाठी याचिका दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही. यासंदर्भातील अफवा पूर्णपणे निराधार आहे, असंही स्पाइसजेटकडून सांगण्यात येत आहे. स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग म्हणाले की, बंद असलेली विमाने पुन्हा सुरू करण्यावर आणि अधिकाधिक विमाने पुन्हा उड्डाण करण्यावर त्यांचा भर आहे. एअरलाइनच्या तीन विमानांची नोंदणी रद्द करण्यासाठी लेझर्सने अलीकडेच विमान वाहतूक नियामक डीजीसीएशी संपर्क साधला होता.

नोंदणी रद्द करण्याची मागणी

DGCA वेबसाइटवरील अपडेटनुसार, एअरलाइनच्या तीन विमान भाड्याने देणार्‍या तीन कंपन्या विल्मिंग्टन ट्रस्ट एसपी सर्व्हिसेस, साबरमती एव्हिएशन लीजिंग आणि फाल्गु एव्हिएशन लीजिंग यांनी प्रत्येकी एका विमानाची नोंदणी रद्द करण्याची मागणी केली आहे. एअरक्राफ्ट ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, स्पाइसजेटमध्ये बोईंग ७३७, बी ७३७ मॅक्स आणि प्रादेशिक जेट बॉम्बार्डियर-क्यू ४०० सह ६७ विमाने होती. त्यापैकी ३७ विमाने कार्यरत होती आणि तर ३० विमानं ही ३ मे रोजी सेवेत नाहीत.

उड्डाणे सुरू करण्यासाठी ४०० कोटी जमा केले

गेल्या आठवड्यात स्पाइसजेटने सांगितले होते की, विविध कारणांमुळे बंद असलेल्या आपल्या ताफ्यातील २५ विमान उड्डाणे पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी ४०० कोटी रुपये उभारले आहेत.

Story img Loader