पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑनलाइन गेमिंगवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) २८ टक्क्यांवर नेण्याच्या निर्णयानंतर या क्षेत्रातील मोबाइल प्रीमियर लीग (एमपीएल) आणि हाईक या दोन कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे पाऊल उचलले आहे. याचवेळी गेमिंग क्षेत्रातील नवउद्यमी कंपनी क्विझीने गाशा गुंडाळण्याची घोषणा केली आहे.

ऑनलाइन गेमिंगवरील जीएसटी २८ टक्के करण्याचा निर्णय झाल्याच्या आठवडाभरातच कंपन्यांनी खर्चभार कमी करण्यासाठी मनुष्यबळ कपातीची पावले टाकली आहेत. एमपीएलने भारतातील सुमारे ३५० म्हणजेच अर्धे मनुष्यबळ कमी केले आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. याचवेळी रश गेमिंग युनिव्हर्सची मालकी असलेल्या हाईकने ५५ कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आहे.

याबाबत हाईकचे संस्थापक व मुख्याधिकारी केविन भारती मित्तल म्हणाले की, हाईकमधील ५५ कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. त्यातील २४ जण पूर्णवेळ कर्मचारी नाहीत. एकूण मनुष्यबळाच्या २२ टक्के कपात करण्यात आली आहे. आमचा व्यवसाय सुस्थितीत आहे, परंतु जीएसटीमध्ये चारशे पट वाढ झाली आहे. त्यामुळे खर्चात होणारी वाढ कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Staff cutting in online gaming companies print eco news asj