मुंबई: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला दुसऱ्या तिमाहीत १८,३३१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बँकेचा एकूण नफा अपेक्षेपेक्षा सरस वाढला असला तरी निव्वळ व्याजापोटी उत्पन्नांत मात्र घसरण नोंदविण्यात आली आहे.
स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरअखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात २८ टक्के वाढ नोंदविली. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला १४,३३० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. इतर उत्पन्नात झालेली वाढ आणि कमी झालेला कार्यान्वयन खर्च यामुळे बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे. बँकेचे बिगरव्याज उत्पन्न ४१.५ टक्क्यांनी वाढून १५,२७० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
हेही वाचा >>>Gold Silver Price Today : लग्नसराईपूर्वी सोने -चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील दर
कर्जाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी बँका ठेवींवरील व्याजदरात वाढ करीत आहेत. यामुळे ठेवी मिळविण्यासाठी बँकांमध्ये स्पर्धा सुरू आहेत. त्यातून ठेवींवरील व्याजदरात वाढ करा अन्यथा कर्जाची वाढ मंदावण्याचा धोका, अशा दुहेरी संकटात बँका सापडल्या आहेत. त्यातून त्यांचे व्याजापोटी उत्पन्न आणि एकूण नफा कमी होत आहे. स्टेट बँकेच्या निव्वळ व्याज नफ्यात (कर्जावरील व्याज आणि ठेवींवरील व्याजातील फरक) घट होऊन ते ३.२७ टक्क्यांवर आले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ३.४३ टक्के तर आधीच्या तिमाहीत ३.३५ टक्के पातळीवर होते. बँकेच्या एकूण कर्जांमध्ये १४.९ टक्के, तर ठेवींमध्ये ९.१ टक्के वाढ झालेली आहे.
बुडीत कर्जासाठी दुप्पट तरतूद
बँकेचे एकूण उत्पन्न १.२९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील वर्षीच्या काळात १.१२ लाख कोटी रुपये होते. तर सप्टेंबर तिमाहीत एकूण खर्च ९९,८४७ कोटी रुपयांवर गेला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत ९२,७५२ कोटी रुपये होता. बुडीत कर्जासाठी तरतूद १,८१४ कोटींवरून जवळपास दुप्पट वाढून ३,६३१ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. बँकेच्या एकूण कर्जांमध्ये बुडीत कर्जाचे प्रमाण २.१३ टक्के आहे, जे आधीच्या जून तिमाहीतील २.२१ टक्क्यांवरून किंचित घटले आहे.