मुंबई: गुंतवणूकदारांचे आर्थिक हित आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी शेअर दलाल अर्थात गुंतवणूक पेढ्यांनी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रावरील खर्चात २० टक्के वाढ करण्याची योजना आखली आहे, अशी घोषणा ‘असोसिएशन ऑफ नॅशनल एक्स्चेंज मेंबर्स ऑफ इंडिया’ (ॲन्मी) या दलालांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेने केली असल्याने दलालांच्या खर्चात १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भांडवली बाजार नियामक सेबीनेदेखील विद्यमान वर्षात २० ऑगस्ट २०२४ रोजी सायबर सुरक्षा आणि सायबर रिजिलियन्स आराखडा आखला आहे. त्यानुसार विविध शेअर दलालांची श्रेणी करण्यात आली असून त्यांना आता बँकांप्रमाणे ग्राहकांच्या हितासाठी सायबर सुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापन अधिक मजबूत करावे लागणार आहे. सर्व दलाल, कस्टोडियन आणि डिपॉझिटरी सहभागींना (डीपी) त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे ‘सेबी’ने आदेश दिले आहेत. यामुळे शेअर दलालांच्या खर्चात ८ ते १० टक्के वाढ होणार आहे. मात्र यामुळे ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त भुर्दंड पडणार नसल्याचे ‘ॲन्मी’चे अध्यक्ष हरिन मेहता यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>आइस्क्रीम व्यवसायाच्या स्वतंत्र सूचिबद्ध कंपनीत विलगीकरणास हिदुस्तान युनिलिव्हरची मान्यता

सुमारे ९०० अधिक शेअर दलालांची संघटना असलेल्या ‘ॲन्मी’चे स्टॉकटेक २०२४-२५ हे वार्षिक संमेलन नुकतेच मुंबईत पार पडले. या वार्षिक संमेलनात ६०हून अधिक फिनटेक कंपन्या, शेअर दलाल यांनी सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञान या थीमवर आधारित प्रदर्शन मांडले होते. संमेलनासंदर्भात मेहता म्हणाले की, तंत्रज्ञानातील सुधारणा आणि डिजिटल जगाच्या बदलत्या आवश्यकतांमुळे, भारताचा शेअर दलाली उद्योग मजबूत आणि सर्वसमावेशक बनत आहे. ‘ॲन्मी’ या क्षेत्राच्या मजबुती आणि शाश्वत विकासासाठी वचनबद्ध असून, त्या दृष्टीने काम करत राहणार आहे.

स्टॉकटेक सर्वेक्षण २०२४-२५ भारताच्या भांडवली बाजारात तंत्रज्ञानातील परिवर्तन क्षमता अधोरेखित करते. कृत्रिम प्रज्ञा (एआय), ‘ब्लॉकचेन’ आणि ‘अल्गोरिथम ट्रेडिंग’मधील गुंतवणुकीला प्राधान्य देत असल्याने, सेबी नावीन्यपूर्ण, पारदर्शकता आणि गुंतवणूकदार संरक्षणाचे वातावरण वाढविण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ‘सेबी’चे कार्यकारी संचालक व्ही. एस. सुंदरेशन म्हणाले.