सेन्सेक्स, रुपयाची आणखी घसरगुंडी

मुंबई : अमेरिकी अर्थव्यवस्थेची मजबुती दर्शवणारी आकडेवारी, परिणामी तेथे आणखी व्याजदर कपात होण्याच्या मावळलेल्या शक्यतेने जगभरात बाजारात विक्रीची लाट निर्माण केली आणि त्याने स्थानिक बाजारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनाही सोमवारी धुऊन काढले. एक हजारहून अधिक अंशांनी गडगडलेला सेन्सेक्सने ७७ हजारांखाली बुडी मारली. दुसरीकडे रुपया डॉलर ५८ पैशांच्या दोन वर्षांतील सर्वाधिक घसरणीसह ८६.६२ च्या सर्वकालीन नीचांकावर गेला.

Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
zara dar pornhub video income
Zara Dar: PhD सोडून पॉर्नहब निवडलं; आता अभ्यासाचे व्हिडीओ टाकून कमावते अधिक पैसे; कोण आहे जारा डार?
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
zomato swiggy now sell their food products directly to consumer
झोमॅटो, स्विगीकडून आता त्यांच्या खाद्य उत्पादनांची थेट विक्री; हॉटेल व्यावसायिकांचा विरोध, कारवाईची सरकारकडे मागणी 
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

परकीय गुंतवणूकदारांच्या स्थानिक बाजारातून वेगाने सुरू असलेल्या माघारीनेही सोमवारच्या सत्रात आणखीच गती पकडली. परिणामी सेन्सेक्स दिवसअखेर १,०४८.९० अंशांच्या गटांगळीसह ७६,३३०.०१ स्थिरावला. दुसरीकडे निफ्टीनेही ३४५.५५ अंश घसरणीसह २३,१००च्या महत्त्वपूर्ण पातळीपासून फारकत घेतली. परकीय गुंतवणूकदारांना नववर्षातील आतापर्यंतच्या मोजक्या सत्रातच तब्बल २२, १९४ कोटी रुपयांहून अधिक समभाग विक्री केली आहे. भांडवली बाजारांत सलग चौथ्या दिवशी सुरू राहिलेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची जवळपास २५ लाख कोटी रुपयांची मत्ता होत्याची नव्हती केली.

हेही वाचा >>> भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 

ढासळता रुपया, तेल भडक्याची चिंता

देशांतर्गत अर्थव्यवस्था वाढीचा दर ६.४ टक्क्यांचा चार वर्षांतील नीचांक गाठण्याचा अंदाज, गडगडत्या रुपयासह, देशांतर्गत कंपन्यांच्या तिमाही कामगिरीच्या आघाडीवरील निराशा, त्यातच खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीही पुन्हा पिंपामागे ८० डॉलरवर तापणे, अशा चिंतांचा वेढा बाजाराला पडला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ८६.६२ या पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्यात दोन वर्षांतील सर्वात मोठी ५८ पैशांची अर्थात ०.७ टक्के घसरण नोंदविण्यात आली. याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये रुपयात एवढी मोठी घसरण झाली होती.

छोट्या गुंतवणूकदारांनाच सर्वाधिक फटका

बाजारातील भीतीयुक्त नकारात्मकतेने बहुतांश समभागांत घसरण झाली. सर्वच क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात अर्थात घसरणीसह बंद होणे, असे क्वचितच घडते. तब्बल ५०८ समभागांचे भाव त्यांच्या वार्षिक नीचांकाखाली गडगडले. प्रमुख निर्देशांक म्हणजेच सेन्सेक्स-निफ्टीतील घसरण ही दीड-पावणे दोन टक्क्यांची असली तरी, व्यापक बाजारात त्याहून अधिक ३ ते ४ टक्क्यांची घसरण दिसून आली. छोट्या वैयक्तिक गुंतवणूकदारांनी धारण केलेल्या समभागांमधील घसरणीचे प्रमाण मोठे आणि त्यामुळे सर्वाधिक नुकसानही याच गुंतवणूकदारांच्या वाट्याला आले.

अमेरिकेत रोजगारवाढीच्या सप्ताहअखेर जाहीर झालेल्या आकडेवारीने जागतिक बाजारात गदारोळ उडवून दिला. परिणामी आधीच धष्टपुष्ट बनलेला डॉलर आणखी मजबूत झाला, तर अमेरिकी रोख्यांवरील परतावा दरही वाढून ५ टक्क्यांपुढील पातळीवर पोहोचला. त्यामुळे तेथे व्याजदरात कपात होणार नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळे भारतासह विकसनशील देशांतील बाजारपेठांचे आकर्षण संपुष्टात येऊन, परकीय भांडवलाची अधिकच जोमाने माघारीची भीती आहे. विनोद नायरसंशोधनप्रमुख, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस

Story img Loader