मुंबई : निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या महिंद्र अँड महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी या समभागांतील खरेदीने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये शुक्रवारी २५० अंशांची भर पडली आणि तो पुन्हा एकदा ७४ हजारांच्या पातळीपाशी पोहोचला आहे. अत्यंत राहिलेल्या सत्रात दिवसभरातील नीचांकी पातळीवरून सेन्सेक्स सावरला.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २५३.३१ अंशांनी वधारून ७३,९१७.०३ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ७४,०७०.८४ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ६२.२५ अंशांची वाढ झाली आणि तो २२,४६६.१० पातळीवर बंद झाला.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Rupee depreciated by 5 paise against the dollar
ढासळता रुपया नव्या तळाला; डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून ८४.३७ चा नीचांक
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले
The pros and cons of Donald Trump victory for investors
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे गुंतवणूकदारांना असेही लाभ-तोटे!
ranbir kapoor ramayana poster out
ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट, निर्मात्यांनी जाहीर केला मोठा ट्विस्ट
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates : अमेरिकेच्या निवडणुकीत सहा भारतीयांची एन्ट्री; श्री ठाणेदार मिशिगनमधून विजयी!
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 : कमला हॅरीस यांचा पराभव, रात्रीचं भाषणही रद्द!

संमिश्र जागतिक संकेत आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हची व्याजदर कपातीबाबतची अनिश्चितता असूनही, भारतीय भांडवली बाजाराने मजबूत पुनर्प्राप्ती अनुभवली. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिडकॅप आणि स्मॉलकॅल कंपन्यांच्या समभागांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि चौथ्या तिमाहीतील चांगल्या कमाईमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण होते. वाहननिर्मिती आणि ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांचे समभाग आजच्या तेजीला कारणीभूत ठरले, असे मत जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>> Pf Money Withdraw: पीएफ खात्यातून तुम्ही कोण कोणत्या कामांसाठी पैसे काढू शकता? जाणून घ्या सविस्तर

सेन्सेक्समध्ये महिंद्र अँड महिंद्रचा समभाग ५.९७ टक्क्यांसह तेजीत होता. त्यापाठोपाठ जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्रा सिमेंट, कोटक बँक, आयटीसी आणि एनटीपीसीचे समभाग वधारले. तर रिलायन्स इंडस्ट्रीज ०.७३ टक्क्यांनी वधारून २,८७१ रुपयांवर बंद झाला. दुसरीकडे, टीसीएस, एचसीएल टेक, नेस्ले इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह, विप्रो आणि इन्फोसिसचे समभाग घसरले.

रुपया १७ पैशांनी मजबूत

सप्ताहअखेरच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाने १७ पैशांची भर नोंदवली. सकारात्मक देशांतर्गत बाजार आणि नव्याने आलेल्या परकीय निधीच्या प्रवाहाने शुक्रवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया १७ पैशांनी वधारून ८३.३३ पातळीवर बंद झाला. सकाळच्या सत्रात रुपयाने ८३.५० पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवभरात त्याने ८३.३२ अंशांची उच्चांकी तर ८३.५० अंशांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.५० वर स्थिरावला होता.

हेही वाचा >>> Gold-Silver Price: सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांना घाम फुटला, १० ग्रॅमचा दर ऐकून बसेल धक्का

येत्या सोमवारी लोकसभेच्या मुंबईतील सहा जागांसाठी मतदान पार पडणार असल्याने दोन्ही प्रमुख भांडवली बाजाराचे कामकाज बंद राहणार आहे. भांडवली बाजारातील कॅशसह, फ्युचर्स आणि ऑप्शन्स विभागामध्येदेखील कोणतेही व्यवहार पार पडणार नसल्याचे प्रमुख बाजारमंचांकडून सांगण्यात आले. भांडवली बाजारासह कमॉडिटी आणि चलनविनिमय व्यवहारदेखील बंद राहणार आहेत. मात्र शनिवारी, १८ मे रोजी आपत्कालीन प्रसंग हाताळण्याची तयारी म्हणून बीएसई आणि एनएसई या बाजारमंचांनी विशेष व्यवहार सत्र आयोजित केले आहे. त्यामुळे शनिवारी शेअर बाजारातील कामकाज सकाळी ९.१५ ते १० वाजेपर्यंत आणि मध्यंतरानंतर ११.३० ते १२.३० अशा मर्यादित वेळेसाठी सुरू राहील.

सेन्सेक्स ७३,९१७.०३ २५३.३१ ( ०.३४%)

निफ्टी २२,४६६.१० ६२.२५ ( ०.२८%)

डॉलर ८३.३३ -१७

तेल ८३.४८ ०.२५