मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स मंगळवारच्या सत्रात २३९ अंशांनी उसळला तर निफ्टीने मंगळवारी सात सत्रातील घसरणीला विराम दिला. जागतिक पातळीवरील संमिश्र कलादरम्यान देशांतर्गत आघाडीवर बँकिंग, माहिती-तंत्रज्ञान आणि वाहन निर्मिती कंपन्यांच्या समभागांमधील मूल्य-खरेदीने निर्देशांकाला बळ दिले.

सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २३९.३७ अंशांनी वधारून ७७,५७८.३८ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने १,११२.६४ अंशांनी कमाई करत ७८,४५१.६५ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे बाजारातील तेजीला मर्यादा आल्या. दुसरीकडे सलग सात सत्रांच्या घसरणीनंतर निफ्टी निर्देशांकाने उसळी घेतली. निफ्टी ६४.७० अंशांनी वधारला आणि २३,५१८.५० पातळीवर स्थिरावला. निर्देशांकाने दिवसभरात ३०० अंशांनी उसळी घेत २३,७८० अंशांची उच्चांकी पातळी गाठली होती.

Western Railway has clarified that air conditioned local trains will continue to operate from Bhayandar railway station
८:२४,ची लोकल वातानुकूलितच ,आंदोलनानंतरही रेल्वे प्रशासन ठाम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Uttar Pradesh News Denied petrol
Uttar Pradesh : हेल्मेट न घातल्याने पेट्रोल नाकारले, संतप्त लाइनमनने थेट पेट्रोल पंपाची वीजच खंडीत केली; प्रशासने दिले चौकशीचे आदेश
Sudhir Mungantiwar , Chandrapur Power Station,
“…तर चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद करू,” मुनगंटीवार यांचा इशारा
Chandrashekhar Bawankule gave hints about confusion over allocation of guardian ministers will end in two days
पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत
mumbai sindhudurg air plane
मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा दोन महिने बंद
MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
tata education trust provision
टीसच्या कर्मचाऱ्यांना मार्च २०२६ पर्यंत दिलासा, टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून ११५ कर्मचाऱ्यांसाठी भरीव तरतूद

हेही वाचा : ‘मेटा’ला २१३ कोटी रुपयांचा दंड, भारतीय स्पर्धा आयोगाकडून कठोर शेऱ्यांसह आदेश

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) समभाग विक्रीचा मारा, कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा कमकुवत तिमाही निकाल आणि अमेरिकी रोख्यांवरील उच्च परतावा दरामुळे निफ्टीमध्ये गेल्या सात सत्रांमध्ये १,०३० अंशांची म्हणजेच ४.३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. तर या कालावधीत सेन्सेक्स ३,००० अंश गमावून ७७,३०० पातळीपर्यंत खाली आला होता.

गुंवतवणूदारांनी सावधगिरी बाळगल्यामुळे बाजारातील तेजी टिकाव धरू शकली नाही. एफआयआयची सातत्यपूर्ण समभाग विक्री, दुसऱ्या तिमाहीतील कमकुवत निकाल आणि वधारलेल्या भावावर गुंतवणूदारांचा नफावसुली करण्याकडे कल दिसून आला. याबरोबरच आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनिमित्त भांडवली बाजारात बुधवारी व्यवहार बंद असल्याने गुंतवणूदारांनी समभाग विकून नफा पदरात पाडून घेण्याला प्राधान्य दिले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा : बँकांची कर्ज परवडणारी हवीत – सीतारामन

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांच्या समभागांमध्ये महिंद्र अँड महिंद्र, टेक महिंद्र, एचडीएफसी बँक, टायटन, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड आणि इन्फोसिसचे समभाग सर्वाधिक वधारले. तर बाजार तेजीत रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह, मारुती, टाटा स्टील आणि भारती एअरटेल यांची कामगिरी निराशाजनक राहिली. सोमवारच्या सत्रात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १,४०३.४० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २,३३०.५६ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.

आज बाजार बंद

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजाराचे (बीएसई) कामकाज बुधवारी बंद राहणार आहे. गुरुवारी बाजारातील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

सेन्सेक्स ७७,५७८.३८ २३९.३७ (०.३१%)

निफ्टी २३,५१८.५० ६४.७० (०.२८%)

डॉलर ८४.४३ १ पैसा

तेल ७३.१२ -०.२५

Story img Loader