मुंबई: प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात सकारात्मक बंद नोंदवला. जागतिक बाजारपेठेतील कल आणि देशांतर्गत आघाडीवर बँकांच्या समभागांमध्ये विशेषतः स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या खरेदीने निर्देशांकांना तेजीचे बळ दिले.

मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३६३.९९ अंशांनी वधारून ८०,३६९.०३ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ७९,४२१.३५ हा नीचांक, तर ८०,४५०.४८ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीने १२७.७० अंशांची कमाई केली आणि तो २४,४६६.८५ पातळीवर बंद झाला.

Diwali muhurat trading 2024
मुहूर्ताचे सौदे यंदा शुक्रवारी संध्याकाळी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
European union and india
युरोपीय महासंघ-भारतादरम्यान मुक्त व्यापार करारासाठी उत्सुक, स्पेनच्या अध्यक्षांचे मुंबई दौऱ्यात प्रतिपादन
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”

हेही वाचा : ‘जिओ पेमेंट सोल्युशन्स’ला रिझर्व्ह बँकेचा ऑनलाइन देयक मंच म्हणून परवाना

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने नकारात्मक पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या निवडक कंपन्यांच्या समभागांमधील चौफेर खरेदीने निर्देशांक वधारले. विशेषत: बँकिंग क्षेत्रातील समभाग जसजसे वधारले, तसतसे बाजार निर्देशांकही चढत गेले, असे निरीक्षण रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी नोंदवले.

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) अखंडपणे खरेदी सुरू ठेवल्यानेही तेजीला मदत झाली. सेन्सेक्समध्ये स्टेट बँकेच्या समभागाने ५ टक्क्यांनी झेप घेतली, त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स आणि लार्सन अँड टुब्रो यांचे समभाग तेजीत होते. तर मारुती, टाटा मोटर्स, सन फार्मा, भारती एअरटेल, इंडसइंड बँक आणि महिंद्र अँड महिंद्रच्या समभागांनी गुंतवणूकदारांची निराशा केली. दुसरीकडे संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारच्या सत्रात ३२२८.०८ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १,४००.८५ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

हेही वाचा :मुहूर्ताचे सौदे यंदा शुक्रवारी संध्याकाळी

सेन्सेक्स : ८०,३६९.०३ ३६३.९९ ( ०.४६%)

निफ्टी : २४,४६६.८५ १२७.७० ( ०.५२%)

डॉलर : ८४.०७ – ००

तेल : ७१.८९ ०.६६

Story img Loader