मुंबई : अमेरिकी भांडवली बाजारातील मजबूत कल आणि देशांतर्गत आघाडीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आलेल्या तेजीने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीवर स्वार होते.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २४१.८६ अंशांनी वधारून ७१,१०६.९६  पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ३९४.४५ अंशांची झेप घेत ७१,२५९.५५ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९४.३५ अंशांची वाढ झाली आणि तो २१,३४९.४० पातळीवर पोहोचला.

sensex drops 110 points nifty settles at 23532
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले

हेही वाचा >>> LPG Price Drop: गॅस सिलिंडरच्या दरात घसरण! आजपासूनच निर्णयाची अंमलबजावणी सुरु, पाहा नवी किंमत

गुंतवणूकदारांनी ‘बाय ऑन डिप्स’ म्हणजेच घसरलेल्या बाजारात कमी किमतीला समभागांची खरेदी हे धोरण अवलंबिले आहे.  खनिज तेलातील नरमाई, अमेरिकी अर्थव्यवस्थेची मंदावलेला विकासवेग, डॉलरमधील घसरण यामुळे आगामी वर्षात दर कपातीचे संकेत मिळत आहेत. शिवाय देशांतर्गत आघाडीवर

व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभाग खरेदीवर गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केले आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले. सेन्सेक्समध्ये विप्रोचा समभाग ६ टक्क्यांहून अधिक वधारला. त्यापाठोपाठ एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा मोटर्स, मारुती, टाटा स्टील, इन्फोसिस, टेक महिंद्र, लार्सन अँड टुब्रो आणि जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग तेजीत राहिले. तर स्टेट बँक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली.