मुंबई : अमेरिकी भांडवली बाजारातील मजबूत कल आणि देशांतर्गत आघाडीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आलेल्या तेजीने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीवर स्वार होते.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २४१.८६ अंशांनी वधारून ७१,१०६.९६ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ३९४.४५ अंशांची झेप घेत ७१,२५९.५५ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९४.३५ अंशांची वाढ झाली आणि तो २१,३४९.४० पातळीवर पोहोचला.
हेही वाचा >>> LPG Price Drop: गॅस सिलिंडरच्या दरात घसरण! आजपासूनच निर्णयाची अंमलबजावणी सुरु, पाहा नवी किंमत
गुंतवणूकदारांनी ‘बाय ऑन डिप्स’ म्हणजेच घसरलेल्या बाजारात कमी किमतीला समभागांची खरेदी हे धोरण अवलंबिले आहे. खनिज तेलातील नरमाई, अमेरिकी अर्थव्यवस्थेची मंदावलेला विकासवेग, डॉलरमधील घसरण यामुळे आगामी वर्षात दर कपातीचे संकेत मिळत आहेत. शिवाय देशांतर्गत आघाडीवर
व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभाग खरेदीवर गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केले आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले. सेन्सेक्समध्ये विप्रोचा समभाग ६ टक्क्यांहून अधिक वधारला. त्यापाठोपाठ एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा मोटर्स, मारुती, टाटा स्टील, इन्फोसिस, टेक महिंद्र, लार्सन अँड टुब्रो आणि जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग तेजीत राहिले. तर स्टेट बँक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली.