मुंबई : जागतिक पातळीवरील सकारात्मक कल आणि निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या स्टेट बँक, एचडीएफसी बँक आणि महिंद्र अँड महिंद्रच्या समभागातील तेजीने निर्देशांक गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात सकारात्मक पातळीवर स्थिरावले. परिणामी सेन्सेक्स सत्रात पुन्हा ७२,००० च्या पातळीवर विराजमान झाला, तर निफ्टीनेदेखील २२,००० पर्यंतचे अंतर आणखी कमी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २२७.५५ अंशांनी वाढून ७२,०५०.३८ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ७२,१६४.९७ अंशांची उच्चांकी तर ७१,६४४.४४ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेदेखील ७०.७० अंशांची भर घालत २१,९१०.७५ अंशांची पातळी गाठली.

हेही वाचा >>> ‘इंटिरिअर्स अँड मोअर’ची ४२ कोटींची समभाग विक्री  

जागतिक भांडवली बाजारातील सकारात्मक भावनांचे प्रतिबिंब देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. युरो झोन क्षेत्रातील महागाई नियंत्रणाचा कल, आणि कंपन्यांच्या चांगल्या कमाईमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा दर्जेदार लार्ज-कॅप कंपन्यांच्या समभागांना अधिक झुकते माप दिले असून, ज्यामुळे त्यांनी स्मॉल आणि मिड-कॅप कंपन्यांच्या समभागांच्या बाबतीत सावधगिरी बाळगली आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये महिंद्र अँड महिंद्रचा समभाग ६.५१ टक्क्यांनी वधारला, त्यापाठोपाठ एनटीपीसी, पॉवरग्रिड, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स आणि विप्रो यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. गेल्या काही सत्रांत घसरण कळा सोसत असलेला एचडीएफसी बँकेचा समभाग मागील बंदच्या तुलनेत २.१५ टक्क्यांनी वाढून प्रत्येकी १,४१३.७५ रुपयांवर बंद झाला. दुसरीकडे ॲक्सिस बँक, आयटीसी, एचयूएल, नेस्ले इंडिया आणि सन फार्माच्या समभागात घसरण झाली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारच्या सत्रात ३,९२९.६० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

सेन्सेक्स ७२,०५०.३८ २२७.५५ (०.३२%)

निफ्टी २१,९१०.७५ ७०.७० (०.३२%)

डॉलर ८३.०४ २

तेल ८१.५३ -०.०९

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market update sensex close at 72000 nifty settle 21910 print eco news zws