मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात प्रचंड अस्थिरतेचा सामना करावा लागला. बँकांच्या समभागातील पडझड आणि परदेशी निधीच्या निर्गमनामुळे सलग चौथ्या सत्रात मंदीवाल्यांचा जोर कायम आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून नजीकच्या काळात दर कपातीची आशा मावळल्याने आणि देशांतर्गत भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याने बाजारात मोठे चढ-उतार झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने सकारात्मक पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केल्यांनतर दुपारच्या सत्रात त्यात मोठी घसरण झाली. दिवसअखेर तो ४५४.६९ अंशांच्या घसरणीसह ७२,४८८.९९ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सचा दिवसभरातील उच्चांक आणि नीचांक यात १,१०७ अंशांचे अंतर होते. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५२.०५ अंशांची घसरण झाली आणि तो २१,९९५.८५ पातळीवर विसावला. दिवसभरात त्याने देखील २२,३२६.५० अंशांची उच्चांकी आणि २१,९६१.७० अंशांची नीचांकी पातळी गाठली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा