मुंबई : जागतिक पातळीवरील कमकुवत कल आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात शुक्रवारच्या सत्रात अस्थिरतेचे वातावरण राहिले. परिणामी प्रमुख निर्देशांकांमध्ये १ टक्क्यांपर्यंत घसरण होत सेन्सेक्स पुन्हा ७३,००० अंशांच्या पातळी खाली घसरला.

सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४५३.८५ अंशांनी घसरून ७२,६४३.४३ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ६१२.४६ अंश गमावत ७२,४८४.८२ अंशांची सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १२३.३० अंशांची घसरण झाली आणि तो २२,०२३.३५ पातळीवर बंद झाला.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
prarthana behere complete 7 year of marriage recalls her first meeting
पाच तास गप्पा, पॅनकेक अन् २ किलो बटर…; अरेंज मॅरेज पद्धतीने जमलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; पहिल्या भेटीत नेमकं काय घडलेलं?
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना

हेही वाचा >>> निर्यात ४१.४० अब्ज डॉलरसह ११ महिन्यांच्या उच्चांकी; फेब्रुवारीत व्यापार तूट वाढून १८.७१ अब्ज डॉलरवर

मिड-कॅप, स्मॉल कॅप फंडात डिसेंबर २०२२ नंतर सर्वाधिक घसरण सरलेल्या आठवड्यात अनुभवास आली. सरलेल्या आठवड्यात लार्ज कॅप निर्देशांकात साधारण २ टक्क्यांची घसरण झाली असताना, स्मॉल आणि मिड-कॅप निर्देशांकात मात्र अनुक्रमे ५.५ टक्के आणि ४.६६ टक्क्यांची घसरण दिसून आली.

व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांच्या बाबतीत गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भूमिका बाळगली आहे. परिणामी त्या निर्देशांकांमध्ये शुक्रवारच्या सत्रातही घसरण झाली. मात्र जागतिक पातळीवर कमॉडिटीच्या किमतींमधील घसरण आणि आगामी आर्थिक वर्षात देशाच्या विकासवेगात वाढ होण्याची आशा असून देशांतर्गत मागणी आणखी मजबूत होण्याची आशा आहे. या वाढत्या आशावादामुळे व्यापक बाजारपेठेत पुन्हा वाढ होण्यास मदत होईल, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

हेही वाचा >>> विकासदर आकडेवारी गूढ, भ्रामक ! माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांची टीका

तेल वितरण कंपन्यांचे समभाग घसरले

केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुरुवारी उशिरा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची कपात जाहीर केली. परिणामी शुक्रवारी भांडवली बाजार उघडल्यानंतर त्याचे सरकारी तेल वितरण कंपन्यांच्या समभागावर प्रतिकूल पडसाद उमटले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) या कंपन्यांच्या समभागात ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. एचपीसीएलचा समभाग ६.२९ घसरून ४६८.७०. रुपयांवर स्थिरावला. दिवसभरात तो ९.८२ टक्क्यांनी घसरून ४५१ रुपयांवर आला होता. आयओसीचा समभाग ५.४६ टक्क्यांनी घसरून १६१.५१ रुपयांवर बंद झाला. शुक्रवारच्या सत्रात तो ९.८८ टक्क्यांनी घसरून १५३.६० रुपयांपर्यंत खाली आला होता. तर बीपीसीएलचा समभाग दिवसभरात ८.२० टक्क्यांनी घसरून ५५९.०५ रुपयांपर्यंत खाली आला. मात्र नंतर तो सावरून ३.४७ टक्क्यांच्या घसरणीसह ५८६.२५ रुपयांवर बंद झाला.

सेन्सेक्स ७२,६४३.४३ -४५३.८५ (-०.६२%)

निफ्टी २२,०२३.३५ -१२३.३० (-०.५६%)

डॉलर ८२.८८ ४ तेल ८४.८४ -०.६८